Waqar Younis Apology | IND vs PAK: पाकिस्तानच्या वकारने अखेर हिंदुंची मागितली माफी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs PAK: पाकिस्तानच्या वकारने अखेर हिंदुंची मागितली माफी

T20 WC Controversy : नमाज पठण अन् हिंदू... वाचा काय म्हणाला होता वकार युनिस

IND vs PAK: पाकिस्तानच्या वकारने अखेर हिंदुंची मागितली माफी

India vs Pakistan, T20 World Cup 2021: विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला. विराटने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत संघाला १५१ धावांपर्यंत मजल मारून दिली. पण पाकिस्तानच्या सलामीवीरांनीच पाकला विजय मिळवून दिला. मोहम्मद रिजवान आणि बाबर आझम या दोघांनीही प्रत्येकी नाबाद अर्धशतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यानंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटर वकार युनिस याने एक वादग्रस्त विधान केलं होतं. त्यावरून, हिंदूधर्मीयांच्या भावना दुखावल्याबद्दल त्याच्यावर अनेकांनी टीका केली. त्यानंतर अखेर त्याने घडलेल्या प्रकारबद्दल माफी मागितली.

हेही वाचा: T20 WC: "निर्लज्ज माणूस"; वकारवर व्यंकटेश प्रसाद संतापला

नक्की काय झालं?

सलामीवीर मोहम्मद रिझवानने सामना संपल्यानंतर मैदानावरच नमाज पठण केले. याबाबत बोलताना पाकचा वकार युनिस म्हणाला होता की, मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम यांनी उत्तम खेळ तर केलाच. आजूबाजूला अनेक हिंदू असताना त्यांच्यासमोर रिझवानने नमाज पठण केले, ही गोष्ट खास आहे.

हेही वाचा: T20 WC: भारताला हरवलं म्हणून खूप उड्या मारू नका - पाक कर्णधार

वकारने मागितली हिंदुंची माफी

प्रचंड टीकेनंतर अखेर बुधवारी वकार युनिस याने घडलेल्या प्रकाराबाबत ट्विट करून माफी मागितली. पाकच्या विजयानंतर बोलण्याच्या ओघात मी जे काही बोललो त्यातून कोणच्याही भावना दुखवण्याचा माझा हेतू नव्हता. पण तरीही मी त्या विधानाबाबत माफी मागतो आणि दिलगिरी व्यक्त करतो. मी ते वक्तव्य मुद्दाम केलं नव्हतं. माझ्याकडून अनावधनाने ती चूक घडली. सर्व प्रकारच्या जाती-धर्मांच्या, वर्णाच्या माणसांना खेळ कायमच एकत्र आणतं याची मला कल्पना आहे. मी माझी चूक मान्य करतो", असं ट्वीट वकार युनिसने केलं.म

हेही वाचा: T20 WC: "पाकिस्तानात लहान मुलं पण वरूणसारखी बॉलिंग टाकतात"

व्यंकटेश प्रसाद, हर्षा भोगलेंनी केली होती वकारवर टीका

वकारच्या विधानानंतर भारताचा माजी गोलंदाज व्यंकटेश प्रसाद याने ट्वीट केलं. "हिंदूमध्ये उभं राहून नमाज पठण केलं ही गोष्ट खूपच खास आहे, असं वकार युनिसचं वक्तव्य आहे. अशा पद्धतीचं वक्तव्य करणं म्हणजे खेळामध्ये जिहादी मनोवृत्ती रूजवणे आणि त्याला एका वेगळ्याची वाईट उंचीवर नेणं असं होतं. काय निर्लज्ज माणून आहे", असं प्रसादने ट्वीट केलं.

Venkatesh-Prasad-Waqar-Younis

Venkatesh-Prasad-Waqar-Younis

हर्षा भोगले...

Harsha Bhogle

Harsha Bhogle

प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांनीही वकार युनिसच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. "रिझवानने हिंदुंच्यासमोर नमाज अदा करणं ही खूप खास गोष्ट होती असं वक्तव्य वकार युनिससारख्या बड्या खेळाडूकडून येणं ही खूपच वाईट गोष्ट आहे. धर्माच्या भिंती पाडून खेळाचा एकत्रित विचार व्हावा यासाठी सारे जण प्रयत्न करत आहेत. अशा वेळी अशी विधानं करणं फारच निराशाजनक आणि धक्कादायक आहे. माझी अपेक्षा आहे की पाकिस्तानातील क्रीडारसिक या विधानाचे गांभीर्य लक्षात घेत यावर टीका करतील आणि माझ्यासारखाच या विधानाचा निषेध करतील. कारण हा खेळ आहे. ही केवळ एक क्रिकेट मॅच आहे", अशा शब्दात हर्षा भोगले यांनी वकार युनिसची कानउघाडणी केली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top