Mohammad Amir  esakal
Cricket

Mohammad Amir : एकदम से जज्बात बदल दिये... सत्तापरिवर्तन होताच मोहम्मद आमिर निवृत्ती घेतली मागे

अनिरुद्ध संकपाळ

Mohammad Amir Retirement : पाकिस्तानचा वादग्रस्त गोलंदाज मोहम्मद आमिरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीमधून बाहेर येण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने जून महिन्यात वेस्ट इंडीज आणि अमेरिका येथे होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठी स्वतःला निवडीसाठी उपलब्ध केलं आहे.

मोहम्मद आमिरवर स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकल्यानंतर 2010 ते 2015 पर्यंत बंदी घालण्यात आली होती. तो यासाठी जेलमध्ये देखील गेला होता. मात्र त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट संघटनेने बंदी संपल्यानंतर त्याला माफ करत पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी दिली होती.

मोहम्मद आमिरने 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र तो जगभरातील टी 20 लीग खेळत आहे. आता पसीबीमध्ये सत्तांतर झालं असून मोहसीन नक्वी हे पीसीबी चेअरमन झाले आहे. त्यानंतर मोहम्मद आमिरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपली निवृत्ती मागे घेतली.

मोहम्मद आमिर ट्विट करत म्हणाला की, 'मी अजूनही पाकिस्तानकडून खेळण्याचं स्वप्न पाहतो आहे. आयुष्याच्या या टप्प्यावर मी माझ्या निर्णयाचा पुन्हा विचार करावा अशी स्थिती आहे. माझ्यात आणि पीसीबीमध्ये काही सकारात्मक चर्चा झाली आहे.

पीसीबीने माझी पाकिस्तानला अजूनही गरज आहे, मी अजूनही पाकिस्तानकडून खेळू शकतो. असे फिल करून दिले.'

मोहम्मद आमिरने पाकिस्तानकडून शेवटचा टी 20 सामना हा ऑगस्ट 2020 मध्ये खेळला होता. त्याला आता काकूल येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय सराव शिबिरासाठी बोलावलं जाऊ शकतं.

आमिर म्हणाला की, मी माझ्या कुटुंबाशी चर्चा केली अन् स्वतःला येणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठीच्या निवडीसाठी उपलब्ध केलं आहे. मी हे माझ्या देशासाठी करतोय. हिरव्या जर्सीत देशासाठी खेळणं हे माझ्यासाठी यापूर्वी आणि यापुढे देखील सर्वात मोठी प्रेरणा असणार आहे.

(Cricket News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jio IPO मध्ये गुंतवणुकीची शेवटची संधी! कोणत्या कॅटेगरीतून अर्ज केल्यास फायदा? PAN आणि कॅटेगरीचे नियम समजून घ्या

Nagpur News: नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी २,५३५ कर्मचारी तैनात; सहा जिल्ह्यांतील २.५५ लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क,

IND vs NZ 2nd T20I : मोठी बातमी: भारताच्या स्टार फलंदाजाला दुखापत, पुढच्या मॅचला मुकणार; वैभव सूर्यवंशीला अखेर संधी मिळणार...

Marathi News Live Updates: सीएसएमटी स्थानकावर छताचा भाग कोसळून मोठी दुर्घटना, दोन प्रवासी जखमी

Gokul Election Results Mahayuti Meeting : 29 ऑक्टोबरला 'गोकुळ'च्या अध्यक्षपदाची निवड! त्याआधी 28 ऑक्टोबरला महायुतीची होणार महत्त्वाची बैठक; काय येणार समोर?

SCROLL FOR NEXT