RR vs LSG, Video: नवीन उल हकची बॉलिंग अन् केएल राहुलचा भन्नाट कॅच, धोकादायक बटलर असा झाला बाद

KL Rahul Catch: केएल राहुलने यष्टीरक्षण करताना नवीन उल हकच्या गोलंदाजीवर जॉस बटलरचा शानदार झेल घेतला.
KL Rahul Catch
KL Rahul CatchSakal

KL Rahul Catch: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत चौथा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स संघात झाला. जयपूरमध्ये झालेल्या या सामन्यात लखनौचा कर्णधार केएल राहुलने फलंदाजीच नाही, तर यष्टीरक्षण करतानाही लक्षवेधक कामगिरी केली. मात्र त्याच्या संघाला या सामन्यात राजस्थानकडून पराभवाचा धक्का बसला.

या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे राजस्थानकडून जॉस बटलर आणि यशस्वी जयस्वाल हे सलामीला फलंदाजीला उतरले. बटलरने 2 चौकार ठोकत चांगली सुरुवातही केलेली.

परंतु डावाच्या दुसऱ्या षटकात नवीन उल हकने टाकलेल्या अखेरचा चेंडू बटलरच्या बॅटची कड घेत मागे गेला. यावेळी केएल राहुलने उजवीकडे झुकत जमीनीलगत शानदार झेल घेतला. त्यामुळे बटलरला 9 चेंडूत 11 धावा करून माघारी परतावे लागले.

KL Rahul Catch
Sanju Samson RR vs LSG : संजू भाऊचा शॉट एकदम कडक! बॅटफूटवरून ठोकला मिडऑफला षटकार, VIDEO व्हायरल

त्यानंतर जयस्वालनेही आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याचा अडथळा पाचव्या षटकात मोहसिन खानने दूर केला. मोहसिनने या षटकातील अखेरचा चेंडू अखुड टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न केला, ज्यावर जयस्वालने पुल शॉट खेळला.

परंतु, मिड-ऑनला कृणाल पांड्याने जयस्वालचा झेल घेतला. त्यामुळे जयस्वाल 3 चौकार आणि 1 षटकारासह 12 चेंडूत 24 धावा करून माघारी परतला. मात्र नंतर कर्णधार संजू सॅमसनने राजस्थानचा डाव सावरला.

सॅमसनने तिसऱ्या विकेटसाठी रियान परागबरोबर (43) 93 धावांची भागीदारी केली, तर पाचव्या विकेटसाठी ध्रुव जुरेलबरोबर 43 धावांची नाबाद भागीदारी केली.

त्यामुळे राजस्थानने 20 षटकात 4 बाद 193 धावा केल्या. सॅमसनने 52 चेंडूत नाबाद 82 धावा केल्या. त्याने या खेळीत 3 चौकार आणि 6 षटकार मारले. लखनौकडून नवीन-उल-हकने २ विकेट घेतल्या.

त्यानंतर 194 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौकडून केएल राहुलने फलंदाजीतही चांगला खेळ केला. त्याने 58 धावांची खेळी केली. तसेच निकोलस पूरननेही 64 धावांची नाबाद खेळी केली. परंतु, बाकी कोणाला खास काही करता न आल्याने लखनौला 20 षटकात 6 बाद 173 धावाच करता आल्या. राजस्थानकडून ट्रेंट बोल्टने 2 विकेट्स घेतल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com