IPL 2024 GT vs MI Live Score : गुजरातने मुंबईचा तोंडचा घास पळवला; पांड्याच्या नेतृत्वात पराभवाने हंगामाची सुरूवात

Gujarat Giants vs Mumbai Indians Live Scorecard Updates News : आयपीएल 2024 चा पाचवा सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे.
IPL 2024 GT vs MI Live Score : गुजरातने मुंबईचा तोंडचा घास पळवला; पांड्याच्या नेतृत्वात पराभवाने हंगामाची सुरूवात

Gujarat Giants vs Mumbai Indians Scorecard Updates Live :

आयपीएल 2024 चा गुजरात टायटन्स विरूद्ध मुंबई इंडियन्स सर्वात हाय व्होल्टेज सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला. मात्र गुजरातने आपला आपला बदला घेत हार्दिकच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा 6 धावांनी पराभव केला.

गुजरातने मुंबईसमोर विजयासाठी 169 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र मुंबईला 20 षटकात 9 बाद 162 धावांपर्यंतच मजल मारता आली. रोहित शर्माने 43 तर डेवाल्ड ब्रेविसने 46 धावा करत सामन्यावर पकड निर्माण करून दिली होती. मात्र मुंबईच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी कच खाल्ली.

मोहितची पुन्हा एकदा जादुई गोलंदाजी 

मोहित शर्माने टीम डेव्हिडला 10 धावांवर बाद करत मुंबईचे टेन्शन वाढवलं. मुंबईला आता 12 चेंडूत विजयासाठी 27 धावांची गरज आहे.

डेवाल्ड ब्रेविसचेही अर्धशतक हुकले. 

मोहित शर्माने डेवाल्ड ब्रेविसला 46 धावांवर बाद करत मुंबईला चौथा धक्का दिला. यानंतर सामना 18 चेंडूत 36 धावा असा आला.

अखेर साई किशोरने जोडी फोडली. 

रोहित शर्मा आणि डेवाल्ड ब्रेविसने तिसऱ्या विकेटसाठी 77 धावांची दमदार भागीदारी रचली. मात्र ही जोडी साई किशोरने 43 धावांवर खेळणाऱ्या रोहित शर्माला बाद केलं.

रोहित ब्रेविस जोडी जमली, गुजरातचं टेन्शन वाढलं 

रोहित शर्मा आणि डेवाल्ड ब्रेविस यांनी मुंबईचा डाव आक्रमकपणे पुढे नेला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी रचली. यामुळे मुंबईने 10 षटकात 88 धावा केल्या.

IPL 2024 GT vs MI Live Score : मुंबईला तिसऱ्या षटकात दुसरा धक्का, रोहितवर वाढला दबाव

अझमतुल्लाने मुंबई इंडियन्सला आपल्या दुसऱ्या षटकात देखील धक्का दिला. त्याने नमन धीरला 20 धावांवर बाद केलं. जरी मुंबईने 3 षटकात 30 धावा केल्या असल्या तरी दोन फलंदाज देखील गमावले.

IPL 2024 GT vs MI Live Score : मुंबईची सुरूवात खराब, शुन्यावर इशान किशन बाद

गुजरातने विजयासाठी 169 धावांचे आव्हान ठेवले. त्यानंतर अझमतुल्लाने इशान किशनला शुन्यावर बाद करत मुंबईला पहिल्याच षटकात पहिला धक्का दिला.

IPL 2024 GT vs MI Live Score : गुजरातची धावगती मंदावली, कॉट्झीने दिला मोठा धक्का

मुंबईने गुजरातचा झंजावात रोखण्यात यश मिळवलं. कॉट्झीने उमरजाईला बाद करत मोठा धक्का दिला. बुमराहने डेव्हिड मिलरला स्वस्तात बाद करत गुजरातची अवस्था 17 षटकात 4 बाद 133 धावा अशी केली. साई सुदर्शन 45 धावा करून एकाकी झुंज देत आहे.

गिल बाद तरी गुजरातची धडाकेबाज सुरूवात 97-2 (10.5 Ov)

गुजरातचा कर्णधार शुभमन गिल 22 चेंडूत 31 धावा करून बाद झाला. मात्र त्यानंतर साई सुदर्शन आणि उमरजाई यांनी डाव सावरत गुजरातला 11 षटकात 99 धावांपर्यंत पोहचवले.

IPL 2024 GT vs MI Live Score : बुमराहने मुंबईला मिळवून दिली पहिली विकेट; भन्नाट यॉर्करवर साहाची केली दांडी गुल

जसप्रीत बुमराहने मुंबई इंडियन्सला पहिले यश मिळवून दिले. त्याने वृद्धीमान साहाचा 19 धावांवर त्रिफळा उडवला. साहा बाद जाला त्यावेळी गुजरातच्या 4 षटकात 31 धावा झाल्या होत्या.

IPL 2024 GT vs MI Live Score : हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकली, मुंबई अहमदाबादमधून करणार मोहीम सुरू

मुंबईचा नवा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. लाईट्समध्ये खेळपट्टी चांगली होईल त्यावेळी फलंदाजी करणं फायद्याचं असल्याचे हार्दिकने सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com