Ind Vs Eng Rehan Ahmed Marathi News
Ind Vs Eng Rehan Ahmed Marathi News sakal
क्रिकेट

Ind vs Eng : इंग्लंडचा स्टार खेळाडू अचानक भारत गेला सोडून...! संपूर्ण कसोटी मालिकेतून बाहेर, जाणून घ्या कारण

Kiran Mahanavar

India vs England Test series : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा सामना आजपासून रांची येथे सुरू झाला आहे. सामना सुरू होण्यापूर्वी, बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला आहे, कारण त्याचा युवा फिरकी गोलंदाज रेहान अहमद कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे.

कसोटी मालिकेतील तिन्ही सामने खेळणारा लेगस्पिनर रेहान अचानक संघ सोडला आणि रांची कसोटीपूर्वी त्याच्या देशात परतला. कौटुंबिक कारणामुळे रेहान चौथ्या कसोटीपूर्वी परतला.

रांची कसोटी सामन्यात नाणेफेक झाल्यानंतर रेहान अहमद कसोटी मालिकेतून बाहेर पडल्याची बातमी आली आहे. या सामन्याच्या एक दिवस आधी इंग्लंडने त्यांचे प्लेइंग इलेव्हन जाहीर केले होते, त्यात रेहानला स्थान मिळाले नव्हते.

याआधीही तो तिन्ही सामन्यांत खेळला होता, पण विशेष कामगिरी करू शकला नाही. अशा परिस्थितीत त्याच्या कामगिरीमुळे त्याला वगळण्यात आल्याचे मानले जात होते. मात्र आता खरे कारण समोर आले आहे.

रेहान अहमद कौटुंबिक कारणांमुळे या कसोटी तसेच मालिकेतून बाहेर पडला असून तो आपल्या घरी म्हणजेच ब्रिटनला परतला आहे. या मालिका रेहान अहमदसाठी काही खास राहिली नाही. पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर आलेल्या या अननुभवी लेगस्पिनरने 3 सामन्यात केवळ 11 विकेट्स घेतल्या. यापैकी त्याने विशाखापट्टणम कसोटीत 6 विकेट्स घेतल्या.

रांची कसोटीबद्दल बोलायचे झाले तर, या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 2 बदल आहेत. वेगवान गोलंदाज मार्क वुड आणि फिरकी गोलंदाज रेहान अहमदच्या जागी ऑली रॉबिन्सन आणि शोएब बशीरला संधी मिळाली आहे.

टीम इंडियात एकच बदल झाला आहे. जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली असून त्याच्या जागी बंगालचा वेगवान गोलंदाज आकाश दीपला पदार्पणाची संधी मिळाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Lok Sabha Election : बाबाजी‘ फॅक्टरमुळे नाशिकमध्ये ‘काटे की टक्कर', शेवटच्या दोन दिवसात आले महत्व

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धुळ्यात एल एम सरदार हायस्कूल येथील ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळ

Mobile Hacks: 'या' सोप्या ट्रिक्स वापरा, मोबाईलमधील फोटो डिलिट करण्याची येणार नाही वेळ

Lok Sabha Election: विरोधकांनीही मुस्लिम उमेदवारांना ठेवले दूर! 2019 च्या तुलनेत 2024 ची स्थिती काय?

RCB vs CSK: धोनीच्या षटकारामुळे रिंकूची आठवण... CSK विरूद्ध शेवटच्या ओव्हरला काय होत्या भावना, यश दयालच्या वडिलांकडून खुलासा

SCROLL FOR NEXT