IND vs NZ 3rd ODI Prithvi Shaw esakal
क्रीडा

Prithvi Shaw : तिसऱ्या टी20 सामन्यात पांड्याने अखेर संघात बदल केला मात्र पृथ्वी शॉ...

अनिरुद्ध संकपाळ

IND vs NZ 3rd ODI Prithvi Shaw : हार्दिक पांड्याने तिसऱ्या टी 20 सामन्यासाठी आपल्या संघात एकच बदल केला आहे. हा बदल फलंदाजीत झाला नसून गोलंदाजीत झाला आहे. त्याने युझवेंद्र चहलच्या ऐवजी उमरान मलिकला संघात स्थान दिले आहे. सलामीवीर पृथ्वी शॉला तिसऱ्या सामन्यात देखील बेंचवरच बसावे लागणार आहे.

भारताने दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडचे 99 धावांचे आव्हान रडत खडत का होईना पार करत मालिकेत बरोबरी साधली होती. भारताची सलामी जोडी शुभमन गिल आणि इशान किशन वनडेत जरी हिट असले तरी टी 20 क्रिकेटमध्ये या दोघांनाही धावा करण्यात अपयश येत आहे. तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात भारतीय संघात बदल होईल अशी आशा व्यक्त केली जात होती.

फेल गेलेली सलामी जोडी शुभमन गिल आणि इशान किशन यांच्यापैकी एकाला बेचवर बसून पृथ्वी शॉला संधी मिळेल असे वाटत होते. अपेक्षेप्रमाणे हार्दिक पांड्याने तिसऱ्या सामन्यात संघात बदल केला. मात्र हा बदल फलंदाजीत नव्हता तर गोलंदाजी होता. त्याने आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या युझवेंद्र चहलला बाहेरचा रस्ता दाखवत वेगवान गोलंदाज उमरान मलिकला संधी दिली.

सर्वांना पृथ्वी शॉ संघात येईल असे वाटत होते मात्र पांड्याने गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुभमन गिल आणि इशान किशनवर विश्वास दाखवला. मात्र हा विश्वास इशान किशनला सार्थ ठरवता आला नाही. तो दुसऱ्याच षटकात 1 धावा करून माघारी फिरला.

(Sports Latest News)

हेही वाचा : भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शॉ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT