Sachin Tendukar : तुम्ही सर्वांनी नव्या स्वप्नांना जन्म दिला... सचिनने वर्ल्डकप विनर टीमची थोपटली पाठ

Sachin Tendulkar
Sachin Tendulkaresakal

Sachin Tendulkar : भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 19 वर्षाखालील टी 20 वर्लड्कप जिंकणाऱ्या भारतीय महिला संघाचा आज नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये गौरव केला. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या टी 20 सामन्यापूर्वी सचिन तेंडुलकरच्या हस्ते भारताच्या 19 वर्षाखालील महिला क्रिकेट संघाला पहिला वहिला 19 वर्षाखालील टी 20 वर्ल्डकप जिंकून ऐतिहासिक कामगिरी केल्याबद्दल 5 कोटी रूपयांचा चेक देण्यात आला. यावेळी सचिन तेंडुलकरने सं घातील मुलींना तुम्ही नव्या स्वप्नांना जन्म दिल्याचे सांगितले.

Sachin Tendulkar
Prithvi Shaw : तिसऱ्या टी20 सामन्यात पांड्याने अखेर संघात बदल केला मात्र पृथ्वी शॉ...

नरेंद्र मोदी स्टेडियमवरील भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या सामन्याला सुरूवात होण्यापूर्वी भारताच्या 19 वर्षाखालील महिला क्रिकेट संघाचा कौतुक सोहळा पार पडला.

या सोहळ्यावेळी बोलताना सचिन तेंडुलकर म्हणाला की,'माझे स्वप्न हे 1983 ला सुरू झालं होतं. मी त्यावेळी 10 वर्षाचा होतो. भारताने वर्ल्डकप जिंकला आणि माझं स्वप्न सुरू झालं. आता तुम्ही वर्ल्डकप जिंकला आहे. आता तुम्ही अनेक स्वप्नांना जन्म दिला आहे. भारतातीलच नव्हे तर त्याच्या पलिकडे देखील अनेक मुली तुमच्यासारखं होण्याची प्रेरणा घेतील.'

सचिन पुढे म्हणाला की, 'महिला क्रिकेटपटूंना समानतेची वागणूक देणे हे देखील तितकेच महत्वाचे होते. ते काम बीसीसीआयने केले. बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी, जय शहा, राजीव शुक्ला यांनी महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक पावले उचलली.'

Sachin Tendulkar
Wrestler Sambhaji Patil : सत्तावीस इंचाच्या मांड्या असणारा महाराष्ट्र केसरी पडद्याआड

बीसीसीआने WPL महिला प्रीमियर लीगची सुरूवात केल्याबद्दल बीसीसीआयचे कौतुक केले. सचिन तेंडुलकर म्हणाला की, महिला क्रिकेटमध्ये एक मोठी गोष्ट घडली आहे. आता महिला प्रीमियर लीग देखील सुरू होत आहे. त्यामुळे महिला क्रिकेटला मोठी चालना मिळणार आहे.

बीसीसीआयने टी 20 वर्ल्डकप जिंकणाऱ्या 19 वर्षाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाला 5 कोटी रूपये बक्षीस देण्याची घोषणा केली होती. या घोषणेवर त्वरित अमल करत बीसीसीआने सचिनच्या हस्ते संघाची कर्णधार शफाली वर्माकडे 5 कोटी रूपयांचा चेक सुपूर्द केला.

(Sports Latest News)

हेही वाचा : भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शॉ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com