Hardik Pandya 
क्रीडा

Hardik Pandya: मोठी घोषणा; टीम इंडियाचा कर्णधार बनण्यासाठी पांड्या सज्ज ?

Kiran Mahanavar

Hardik Pandya : भारतीय संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. पहिली कसोटी चितगाव येथे खेळली जात आहे. टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेचा भाग नाही. पुढील मालिकेसाठी तो नॅशनल क्रिकेट अकादमी मध्ये जोरदार तयारी करत आहे. त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी संघ जाहीर झालेला नाही. पण श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत हार्दिक पांड्याला कर्णधार बनवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे तो एनसीएमध्ये जोरदार सराव करताना दिसत आहे.

गेल्या महिन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत हार्दिक पांड्याचे नेतृत्व केले होते. त्या मालिकेत भारतीय संघाने 1-0 असा विजय मिळवला होता. पहिला टी-20 पावसामुळे रद्द झाला होता, तर दुसऱ्या सामना भारताने 65 धावांनी विजय मिळवला होता. तिसरा सामना बरोबरीत सुटला.

टी-20 विश्वचषकात भारतीय संघाच्या पराभवानंतर रोहित शर्माच्या कर्णधारपदावर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. तेव्हापासून हार्दिक पांड्याला टी-20 संघाचा नवा कर्णधार बनवण्याची चर्चा आहे. पुढील वर्षी एकदिवसीय विश्वचषक आहे, अशा परिस्थितीत रोहित शर्मा वनडे संघाचा कर्णधार असेल.

हार्दिक पांड्या हा टी-20 क्रिकेटमध्ये कर्णधारपदाची पहिली पसंती आहे, कारण त्याने त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सला IPL 2022 चे चॅम्पियन बनवले. गुजरात टायटन्सने पदार्पणाच्या हंगामातच हा पराक्रम केला. 2022 च्या आयपीएलमध्ये हार्दिक पांड्या त्याच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता डॉक्टरच्या मर्जीतल्या मेडिकलमधून औषधे घ्यायची गरज नाही; तुकाराम मुंढेंचा नवीन आदेश

IND VS AFG 1ST ODI: विराटच्या जागेवर कोण खेळणार? टीम इंडियाच्या प्रशिक्षकाने दिले संकेत; यष्टिरक्षकही बदलणार... नेमकं काय होणार?

Grampanchyat Reservation : उरुळी कांचन ग्रामपंचायत प्रभाग आरक्षणाने 'कही खुशी कही गम'

Devendra Fadnavis: ३७० रुपयांचं बिर्याणी प्रकरण! मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं; मनोरंजनाच्या नावाखाली...

Darwish Rasooli: अफगाणिस्तानचा खेळाडू तातडीने मायदेशी परतला; वन डे मालिकेला सुरूवात होण्यापूर्वी त्याच्यावर कोसळला दुःखाचा

SCROLL FOR NEXT