Rohit Sharma Likely To Return For Second Test Against Bangladesh
Rohit Sharma Likely To Return For Second Test Against Bangladesh

Ind vs Ban: रोहित शर्माबाबत मोठी बातमी! दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार का?

Rohit Sharma India vs Bangladesh: सध्या भारतीय क्रिकेट संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे, जिथे तो दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. चितगाव येथे पहिला कसोटी सामना खेळला जात असून, त्यात तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. तर भारतीय संघाने बांगलादेशला 513 धावांचे मोठे लक्ष्य दिले आहे.

याआधी टीम इंडियाने बांगलादेशविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली होती, ज्यामध्ये त्यांचा 1-2 असा पराभव झाला होता. त्याच मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार रोहित शर्माला दुखापत झाली आणि तिसऱ्या वनडेसह पहिल्या कसोटी सामन्यातून तो बाहेर पडला.

  Rohit Sharma Likely To Return For Second Test Against Bangladesh
Lionel Messi FIFA WC22: पीएसजी आणि मेस्सीचा योग जुळणार?

रोहित शर्मा मुंबईत परतला होता. तेव्हापासून चाहत्यांमध्ये एक मोठा प्रश्न होता की रोहित शर्मा मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळू शकेल की नाही? पण आता रोहित शर्मा फिट झाल्याचं मीडिया रिपोर्ट्समधून समोर आलं आहे. त्याने दुसऱ्या कसोटीत खेळण्याची तयारी सुरू केली आहे. रोहितने दुसऱ्या कसोटीसाठीही तो उपलब्ध असल्याची माहिती संघ व्यवस्थापनाला दिली आहे.

  Rohit Sharma Likely To Return For Second Test Against Bangladesh
ICC World Cup 2023 : BCCI संकटात! ICC ने वर्ल्डकपचे यजमानपद घेतले हिसकावून ?

दुसऱ्या वनडेमध्ये बांगलादेशच्या डावात क्षेत्ररक्षण करताना रोहितच्या डाव्या अंगठ्याला दुखापत झाली होती. सातवी विकेट पडल्यानंतर रोहित मैदानात उतरला असला तरी. दुखापतग्रस्त असतानाही रोहितने शानदार अर्धशतकी खेळी खेळली, मात्र शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून त्याला सामना जिंकता आला नाही. पहिल्या कसोटीत रोहितच्या जागी केएल राहुलने कर्णधारपद भूषवले. तसेच रोहितऐवजी अभिमन्यू ईश्वरनचा संघात समावेश करण्यात आला आहे. आता बांगलादेश विरुद्ध दुसरा कसोटी सामना 22 डिसेंबरपासून मीरपूर येथे खेळला जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com