IND vs AUS odi 
क्रीडा

IND vs AUS : बुमराहनंतर शार्दुल ठाकूर अन् 'हा' दिग्गज सलामीवीर तिसऱ्या ODI सामन्यातून बाहेर, जाणून घ्या कारण?

Kiran Mahanavar

India vs Australia ODI : इंदूर वनडेत भारताने ऑस्ट्रेलियाचा 99 धावांनी पराभव करून तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. या सामन्यात शुभमन गिलने शतक झळकावले होते. आता यादरम्यान एक मोठी बातम्या येत आहेत की, शुभमन गिल आणि शार्दुल ठाकूर राजकोट येथे होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेत खेळणार नाहीत.

या दोन्ही खेळाडूंना वर्कलोड मॅनेजमेंट अंतर्गत विश्रांती देण्याचा निर्णय भारतीय संघ व्यवस्थापनाने घेतला आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, गिल आणि शार्दुल संघासह राजकोटला जाणार नाहीत आणि त्याऐवजी ते थेट गुवाहाटीला जातील, जिथे टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध पहिला सराव सामना खेळणार आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वनडेमध्ये गिलने शतक ठोकले होते. 2023 मधील त्याचे हे 5 वे शतक आहे. या वर्षी गिलने न्यूझीलंडविरुद्ध 2 शतके आणि बांगलादेश, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रत्येकी 1 शतक झळकावले आहे. या वर्षी त्याने टी-20 मध्येही शतक झळकावले आहे.

2023 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत गिल पहिल्या क्रमांकावर आहे. या भारतीय फलंदाजाने आतापर्यंत 20 डावांमध्ये 72 च्या सरासरीने 1230 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 105 आहे.

भारतीय संघ व्यवस्थापन वर्ल्डकप डोळ्यासमोर ठेवून खेळाडूंवर कामाचा भार जास्त देत नाही. याच कारणामुळे भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन वनडेसाठी विश्रांती देण्यात आली होती. हे दोन्ही वरिष्ठ खेळाडू राजकोट येथे होणाऱ्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेसाठी टीम इंडियात सामील होतील. त्याचवेळी जसप्रीत बुमराहला इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वनडेमध्येही विश्रांती देण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT