Ind vs Aus ODI : खराब फॉर्म नाही तर चांगल्या कामगिरीने वाढले टीम इंडियाचे टेन्शन, कोच द्रविड अन् कर्णधार का चिंतेत?

IND vs AUS: भारत 2-0 ने मालिकेत आघाडीवर आहे.
Team India
Team India
Updated on

Ind vs Aus ODI Series

आयसीसी एकदिवसीय वर्ल्डकपपूर्वी संघातील खेळाडूंचा खराब फॉर्म नाही तर चांगली कामगिरी भारतीय संघासाठी अडचणीची ठरली आहे. आशिया कपमध्ये भारतीय संघाने शानदार विजय संपादन केला. या मालिकेनंतर लगेचच टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायला आली.

या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या खेळाडूंना संधी देण्यात आली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सर्वांनी अप्रतिम खेळ दाखवला,

त्यामुळे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांची चिंता वाढली आहे. कारण कोणाला एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान द्यायचे यावर त्यांना खूप मेहनत करावी लागणार आहे.

Team India
Asian Games 2023 : पाकिस्तानने पुन्हा खाली कच! आशिया कपनंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत होणार भारत-श्रीलंका फायनल

आशिया कपमध्ये भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला प्रशिक्षक द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी प्लेइंग इलेव्हनमधून वगळले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने 5 विकेट घेतल्या होत्या.

मोहम्मद सिराजने आशिया कप फायनलमध्ये 6 विकेट घेतल्या होत्या. अनुभवी शमीसोबत जायचे की नवीन सिराजला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान द्यायचे याचा विचार संघ व्यवस्थापनाला करावा लागेल.

Team India
David Warner : डावखुरा डेव्हिड वॉर्नर उजवा झाला तरी कांगारूंचा झाला 99 धावांनी पराभव

भारतीय संघाच्या फलंदाजी क्रमवारीत चौथे स्थान मिळविणारा फलंदाज श्रेयस अय्यरने दुखापतीनंतर पुनरागमन केले. आशिया कपमध्ये तो खेळला नाही कारण तो पुन्हा दुखापतग्रस्त झाला आणि पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून तो बाहेर पडला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने 105 धावा केल्या. सूर्यकुमार आणि श्रेयस अय्यर यांच्यात लढत रंगली आहे. या सूयाने ऑस्ट्रेलियाविरुद्धही सलग दोन अर्धशतके झळकावली आहेत. एवढ्या फॉर्ममध्ये असूनही प्लेइंग इलेव्हनमध्ये त्यांच्या स्थानाची शाश्वती नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com