क्रीडा

Ind vs Nz : 'आतून राग येत होता, कारण...' शतक झळकावल्यानंतर श्रेयस अय्यरने काढला आपला राग

Kiran Mahanavar

Ind vs Nz World Cup 2023 Shreyas Iyer : श्रेयस अय्यरने वर्ल्ड कप २०२३ च्या पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध शानदार शतक झळकावले. चालू वर्ल्ड कपमध्ये त्याने आतापर्यंत 2 शतकांच्या मदतीने 500 हून अधिक धावा केल्या आहेत. मात्र स्पर्धेच्या सुरुवातीला खराब कामगिरी केल्यानंतर त्याच्यावर प्रश्न उपस्थित केले जात होते. यावर आता अय्यर यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

उपांत्य फेरीच्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, अय्यर आणि विराट कोहलीच्या शतकांच्या जोरावर भारतीय संघाने प्रथम खेळताना 397 धावा केल्या. प्रत्युत्तरात मोहम्मद शमीने 7 गडी बाद करत किवी संघाला 327 धावांवर रोखले. टीम इंडिया तब्बल 12 वर्षांनंतर वनडे वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. अय्यरने या सामन्यात 70 चेंडूत 105 धावा केल्या. 8 षटकार मारले.

सामन्यानंतर हॉट स्टारशी बोलताना श्रेयस अय्यर म्हणाला, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर वर्ल्ड कपमधील काही सामन्यांमध्ये मला चांगली कामगिरी करता आली नाही. यानंतर माझ्यावर प्रश्न उपस्थित केले जात होते. एवढेच नाही तर एका विशिष्ट प्रकारच्या चेंडूचा सामना करताना मला त्रास होत असल्याचेही बोलले जात होते. मला आतून राग येत होता आणि मी माझ्या वेळेची वाट पाहत होतो. मी उपांत्य फेरीत शतक झळकावून सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला आहे. श्रेयस अय्यरला शॉर्ट बॉल्समुळे अनेकवेळा अडचणीत येत होता. यावरून त्यांच्यावर टीका होत आहे.

श्रेयस अय्यरने सांगितले की, जेव्हा टीम इंडियाने वानखेडेवर 2011 वर्ल्ड कप फायनल जिंकली तेव्हा मी स्टेडियममध्ये होतो आणि सामना पाहत होतो. तेव्हा मला वाटले की एक दिवस मीही इथे खेळेन.

दुखापतीनंतर त्याच्या पुनरागमनात प्रशिक्षकांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे त्याने सांगितले. आशिया कप स्पर्धेनंतर मी माझी लय परत मिळवू शकलो नाही असे वाटत असले तरी या काळात संघ व्यवस्थापनाने मला पूर्ण पाठिंबा दिला. श्रेयस अय्यरचे हे सलग दुसरे शतक आहे. याआधी त्याने नेदरलँडविरुद्ध 128 धावा करून नाबाद राहिला होता.

न्यूझीलंडविरुद्ध सुरुवातीला श्रेयस अय्यर थोडा संथ दिसत होता. याबाबत तो म्हणाला की, मी पहिले 10 चेंडू काळजीपूर्वक खेळले. रचिन रवींद्रचा चेंडू फिरत नव्हता. त्याच्यावर षटकार मारल्यानंतर मी माझी लय परत मिळवली आणि त्यानंतरही धावा होत राहिल्या.

अय्यर म्हणाले की, जेव्हा तुम्ही विराट कोहलीसोबत खेळता तेव्हा तो तुम्हाला सांगत असतो की आम्हाला कोणती धावसंख्या गाठायची आहे. ते बर्याच काळापासून खेळत आहेत. अशा परिस्थितीत आपल्याला कुठे जायचे आहे, हे त्यांना माहीत असते. ते सतत स्ट्राइक फिरवत असतात. यामुळे दबावही निर्माण होत नाही.

सध्याच्या वर्ल्ड कपमध्ये अय्यर व्यतिरिक्त विराट कोहलीने 711 धावा केल्या आहेत आणि कर्णधार रोहित शर्माने 550 धावा केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Boycott Exit Polls: मतदानोत्तर चाचणीच्या चर्चांवर काँग्रेसचा बहिष्कार; काँग्रेसनं का घेतला असा निर्णय?

Exit Polls 2024: एक्झिट पोल्स महत्वाचे आहेत का? 'या' कारणांमुळं चुकू शकतो अंदाज

IND vs BAN Playing 11 : सराव सामन्यातच ठरणार सलामी जोडी; बुमराहचा पार्टनर कोण असणार?

Virat Kohli : सेमी फायनल, फायनल आली की विराट.... मांजरेकर म्हणतात किंग कोहली टीम इंडियासाठी चिंतेचा विषय

Latest Marathi Live News Update: जीडीपीची आकडेवारी पाहून मोदींनी मानले कष्टकऱ्यांचे आभार

SCROLL FOR NEXT