World Cup 2023: डिव्हीलीयर्सने सेमीफायनलच्या आधी केलं भाकित, दक्षिण आफ्रिका ओलांडणार 'हा' अडथळा

दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज खेळाडू ए.बी डिव्हीलीयर्स याने आपल्या संघावर विश्वास दर्शवला आहे. तो म्हणाला की दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीचा अडथळा पार करेल.
World Cup 2023: डिव्हीलीयर्सने सेमीफायनलच्या आधी केलं भाकित, दक्षिण आफ्रिका ओलांडणार 'हा' अडथळा

World Cup Semi Final 2: दक्षिण आफ्रिकन क्रिकेट संघाला अद्याप एकदाही एकदिवसीय विश्वकरंडकाच्या अजिंक्यपदाला गवसणी घालता आलेली नाही. चार वेळा त्यांना उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. आतापर्यंत उपांत्य फेरीचा अडथळा ओलांडता आला नसला तरी यंदा दक्षिण आफ्रिकन संघ अंतिम फेरीत पोहोचणार, असा विश्वास दक्षिण आफ्रिकन क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू ए. बी. डिव्हीलियर्स याने बुधवारी व्यक्त केला आहे.

ए. बी. डिव्हीलियर्स याने या वेळी चार उपांत्य फेरीत झालेल्या पराभवांबाबत आपले मत व्यक्त केले आहे. या चारही उपांत्य फेरीमध्ये नशिबाची साथ आम्हाला लाभली नाही, असे त्याचे म्हणणे आहे. १९९२ व १९९९ या दोन वर्षांमध्ये झालेल्या विश्वकरंडकातील उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकन संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

या दोन्ही लढतींमध्ये ए. बी. डिव्हीलीयर्स संघामध्ये नव्हता. पण २००७ व २०१५ या वर्षी झालेल्या विश्वकरंडकात तो दक्षिण आफ्रिकन संघाचा सदस्य होता. २०१५मधील विश्वकरंडकाच्या उपात्य फेरीत झालेला पराभव त्याच्या जिव्हारी लागला आहे.(Latest Marathi News)

World Cup 2023: डिव्हीलीयर्सने सेमीफायनलच्या आधी केलं भाकित, दक्षिण आफ्रिका ओलांडणार 'हा' अडथळा
SA vs AUS : आफ्रिका 'चोकर्स'चा शिक्का पुसणार?, पाच वेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाशी आज उपांत्य लढत

गोलंदाजही जोशात

ए. बी. डिव्हीलियर्स याने दक्षिण आफ्रिकन संघातील गोलंदाजांचीही स्तुती केली आहे. मार्को यान्सेन व लुंगी एनगिडी सुरुवातीला प्रतिस्पध्यांचे विकेट बाद करीत आहेत. कगिसो रबाडा व गेराल्ड कोएत्झी मधल्या टप्प्यात छान गोलंदाजी करीत आहेत.

फलंदाज फॉर्ममध्ये

ए. बी. डिव्हीलियर्स याने सध्याच्या दक्षिण आफ्रिकन संघाच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. तो म्हणाला, तेम्बा बवुमाच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकन संघाने घवघवीत यश संपादन केले आहे. या संघातील फलंदाज जबरदस्त कामगिरी करीत आहेत. चार वेगवेगळ्या फलंदाजांनी शतके झळकावण्याचा पराक्रम करून दाखवला आहे. (Latest Marathi News)

World Cup 2023: डिव्हीलीयर्सने सेमीफायनलच्या आधी केलं भाकित, दक्षिण आफ्रिका ओलांडणार 'हा' अडथळा
World Cup 2023: खेळपट्टी बदलावरून विनाकारण वाद! भारत-न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीनंतर वाद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com