IND vs NZ  Sakal
क्रीडा

IND vs NZ : आपल्याच माणसांनी गेम केला; सामना अनिर्णित

अश्विन आणि रविंद्र जाडेजाच्या फिरकीमुळे सामना भारताच्या बाजूनं वळला होता. पण...

सुशांत जाधव

India vs New Zealand, 1st Test : कानपूर कोसोटी सामन्या अनिर्णित राखण्यात न्यूझीलंडला यश आले आहे. अजाझ पटेल आणि रचिन रविंद्र या भारतीय वंशाच्या खेळाडूंनी भारतीय संघाच्या विजयात अडथळा निर्माण केला. या दोघांनी शेवटच्या विकेटसाठी सामना अनिर्णित ठेवणारी खेळी केली. दोघांनी संयमी खेळी करत शेवटची विकेट दिली नाही. अंधूक प्रकाशाचा खेळासंदर्भातही या दोघांनी अपील केल्याचेया पाहायला मिळाले. अखेरच्या दिवशी अश्विन आणि रविंद्र जाडेजाच्या फिरकीमुळे सामना भारताच्या बाजूनं वळला होता. अक्षर पटेल आणि उमेश यादव यांनीही मोक्याच्या क्षणी विकेट मिळवून देत टीम इंडियासाठी उपयुक्त कामगिरी केली. पण अखेर न्यूझीलंडला सामना वाचवण्यात यश आले. न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात जाडेजाने सर्वाधिक चार तर अश्विनला तीन विकेट मिळाल्या. उमेश यादव आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. टीम इंडियाने पहिल्या डावात 345 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडचा पहिला डाव 296 धावांत आटोपून भारताने सामन्यात 49 धावांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात 234 धावा करुन टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर 284 धावांचे टार्गेट सेट केले. अखेरच्या दिवशी टीम इंडियाला विजयासाठी नऊ विकेट मिळवायच्या होत्या. भारतीय संघाने 8 विकेट मिळवल्या पण अखेरची विकेट मिळवण्यात गोलंदाज कमी पडले. भारतीय वंशाच्या रचिन रविंद्रनं 91 चेंडूचा सामना करत नाबाद 18 धावा करुन संघाचा पराभव टाळण्यात मोलाची कामगिरी बजावली. दुसऱ्या बाजूला अखेरच्या टप्प्यात अजाझ पटेल या भारतीय वंशाच्या गड्याने त्याला उत्तम साथ दिली.

भारतीय संघ विजयाच्या समीप पोहचला होता. पण त्यांना विजयासह मालिकेत आघाडी घेण्यात अपयश आले. न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील कानपूरच्या मैदानात रंगलेला हा चौथा सामना होता. 1976 नंतर न्यूझीलंडने या मैदानात सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले आहे. याशिवाय दोन वेळा न्यूझीलंडला कानपूरमध्ये मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे सामना वाचवण्यात त्यांना मिळवलेल यश मोठे ठरते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : महिला पोलिस सोनाली हिंगे हिचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Pune Crime : वारजे, मुंढवा परिसरात हातभट्टी अड्ड्यांवर छापे; विषारी रसायनांचा साठा जप्त

Latest Marathi News Live Update: सगळ्यांना जोडणारं तत्त्व केवळ भारताकडे- मोहन भागवत

गाव जगापासून वेगळं झालं अन् समोर आले डायनोसॉर! हॉलिवूडचा नवा थरार 'द एंड ऑफ ओक स्ट्रीट' लवकरच भेटीला

Katraj Ghat: कात्रज घाटात संरक्षक भिंती ढासळल्या; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे अपघाताचा धोका

SCROLL FOR NEXT