IND Vs NZ : रविचंद्रन अश्विनने तोडला हरभजन सिंगचा रेकॉर्ड

आर अश्विन
आर अश्विन आर अश्विन

कानपूर : इंडिया (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात खेळला जात असलेल्या पहिल्या कसोटीचा आज पाचवा दिवस आहे. १२३ धावांवर किवी संघाचे तीन खेळाडू बाद झाले आहे. या कसोटीचा निकाल काय लागेल हे आताच सांगता येणार नाही, मात्र आर. अश्विन (Ravichandran Ashwin) भारताकडून सर्वाधिक गडी बाद करणारा दुसरा फिरकी गोलंदाज ठरला आहे. यासह त्याने फिरकीपटू हरभजन सिंगला (Harbhajan Singh) मागे टाकले आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेली कानपूर कसोटी शेवटच्या दिवशी रोमांचक वळणावर पोहोचली आहे. न्यूझीलंडला विजयासाठी २८४ धावांची गरज आहे. पाचव्या दिवशी न्यूझीलंडने तीन गडी गमावून १२३ धावा काढलेल्या आहे. पाचव्या दिवसाच्या सुरुवातीला भारतीय संघाच्या गोलंदाजांना कोणतीही चमत्कारिक कामगिरी करता आली नाही.

आर अश्विन
रात्री उशिरा दोघेही करीत होतो उलट्या; आईच्या लक्षात येईपर्यंत...

कानपूर कसोटीतून रविचंद्रन अश्विनने टीम इंडियात पुनरागमन केले. टॉम लॅथमला अश्विनने पायचीत करीत बाद केले. यासह रविचंद्रन अश्विनने सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत हरभजन सिंगचा विक्रम मोडला आहे. रविचंद्रन अश्विन आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारताचा तिसरा गोलंदाज ठरला आहे. अनिल कुंबळे ६१९ बळी घेऊन भारताकडून पहिल्या स्थानावर कायम आहे.

भारतासाठी सर्वाधिक कसोटी बळी

  • अनिल कुंबळे - ६१९

  • कपिल देव - ४३४

  • रविचंद्रन अश्विन - ४१८

  • हरभजन सिंग - ४१७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com