IPL

IPL 2020 : जड्डूचा धमाका, चेन्नई एक्स्प्रेसही प्ले ऑफमध्ये

सुशांत जाधव

IPL 2021: अखेरच्या षटकात अष्टपैलू रविंद्र जाडेजाने केलेल्या धमाकेदार खेळीच्या जोरावर रंगतदार सामन्यात चेन्नईने विजय नोंदवला. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धचा सामना 2 विकेट्सने जिंकत चेन्नईने आपल्या खात्यात 16 गुण जमा केले असून प्ले ऑफमधील स्थान पक्के केले आहे. कोलकाता नाईट रायडर्सने दिलेल्या 172 धावांचा पाठलाग करताना चेन्नईच्या सलामी जोडीने संघाला चांगली सुरुवात करुन दिली. ऋतूराज गायकवाड आणि फाफ ड्युप्लेसिसने पहिल्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी केली.

ऋतूराज 40 धावा करुन परतल्यानंतर फाफ ड्युप्लेसिसही 43 धावा करुन माघारी फिरला. त्यानंतर मोईन अलीने 32 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. अंबाती रायडू 10, सुरेश रैना 11 आणि महेंद्रसिंह धोनी अवघ्या एका धावेवर परतल्यानंतर सामना कोलकाताच्या बाजूनं झुकला होता. पण रविंद्र जाडेजाने 5 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकार खेचत सामना पुन्हा चेन्नईच्या बाजूनं वळवला. अखेरच्या षटकात सुनील नरेनं यानं त्याला पायचित करत सामना पुन्हा रंगतदार स्थितीत आणला. पण लॉर्ड शार्दुल ठाकूरने कोणतीही चूक न करता संघासाठी विजयी धाव घेतली.

तत्पूर्वी राहुल त्रिपाठीच्या 45 धावा, नितेश राणाने केलेली 37 धावांची नाबाद खेळी आणि अखेरच्या षटकात दिशेन कार्तिकने कुटलेल्या 11 चेंडूतील 26 धावांच्या जोरावर कोलकाता संघाने चेन्नईसमोर 172 धावांचे लक्ष्य ठेवले होते. इयॉन मॉर्गनने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. संघाची सुरुवात खराब झाली. पण त्यानंतर राहुल त्रिपाठीनं संघाचा डाव सावरला. चेन्नई सुपर किंग्जकडून जोश हेजलवूड आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. रविंद्र जाडेजाने 1 विकेट घेतली.

अबूधाबीच्या मेैदानात चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना सुरु आहे. शुभमन गिल आणि व्यंकटेश अय्यर या जोडीने कोलकाताच्या डावाला सुरुवात केली. शुभमन गिल चांगला लईत दिसत होता. मात्र अय्यर-गिल यांच्यातील ताळमेळ ढासळला. परिणामी गिलला धावबाद होऊन तंबूत परतावे लागले.

171-8 : नरेननं जाडेजाची विकेट घेत चेन्नईला दिला आणखी एक धक्का

168-7 : सुनील नरेननं सॅम कुरेनला बाद करत सामन्यातील उत्कंठा वाढवली

142-6 : चक्रवर्तीने धोनीला अवघ्या एका धावेवर धाडले माघारी

142-5 : सुरेश रैना स्वस्तात माघारी, वरुण चक्रवर्तीने 11 धावांवर दाखवला तंबूचा रस्ता

138-4 : मोईन अलीच्या रुपात लॉकी फर्ग्युसनने चेन्नईला दिला चौथा धक्का, त्याने 28 चेंडूत 32 धावांची खेळी केली

119-3 : अंबाती रायडू 10 धावा करुन माघारी, सुनील नरेनला मिळाले यश

102-2 : फाफ ड्युप्लेसिसच्या रुपात प्रसिद्ध कृष्णाला मिळाले यश, फाफने 30 चेंडूत 7 चौकाराच्या मदतीने 43 धावा केल्या

74-1 : ऋतूराजच्या रुपात चेन्नईला पहिला धक्का, रसेलच्या चेंडूवर बाद होण्यापूर्वी त्याने 28 चेंडूत 40 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली

चेन्नईच्या सलामीवीरांची अर्धशतकी भागीदारी

कोलकाता नाईट रायडर्सने निर्धारित 20 षटकात 6 बाद 171 धावा केल्या. चेन्नईसमोर 172 धावांचे आव्हान

166-6 : दिशेन कार्तिकच्या रुपात कोलकाता नाईट रायडर्सला सहावा धक्का, त्याने 11 चेंडूत 26 धावांची खेळी केली.

125-5 : लॉर्ड शार्दुल ठाकूरला आणखी एक यश, मसल पॉवर रसेलच्या उडवल्या दांड्या

89-4 : राहुल त्रिपाठीचं अर्धशतक हुकले, रविंद्र जाडेजाला मिळाले यश

70-3 : हेजलवूडच्या गोलंदाजीवर फाफ ड्युप्लेसीसने सीमारेषेवर टिपला अप्रतिम झेल

50-2 : व्यंकटेश अय्यरच्या रुपात कोलकाता संघाला मोठा धक्का, शार्दुल ठाकूरला मिळाले यश

10-1 : पहिल्याच षटकात सलामीच्या जोडीत गोंधळ, गिल झाला धावबाद

Chennai Super Kings Playing 11

ऋतूराज गायकवाड, फाफ ड्युप्लेसीस, मोईन अली, अंबाती रायडू, सुरेश रैना, एमएस धोनी (कर्णधार/ यष्टिरक्षक), रविंद्र जाडेजा, सॅम कुरेन, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर, जोश हेजलवूड.

Kolkata Knight Riders Playing 11

शुभमन गिल, व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, इयॉन मॉर्गन (कर्णधार), नितीश राणा, दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक), आंद्रे रसेल, सुनील नरेन, लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती, प्रसिद्ध कृष्णा.

इयॉन मॉर्गनने टॉस जिंकून घेतला बॅटिंग करण्याचा निर्णय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Hamas War : रमजानमध्ये संदेशवाहक पाठवून युद्ध थांबले, इस्राईल-हमास युद्धावर पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य

Latest Marathi News Live Update : उद्या जर बिभव स्वतः आले नाहीत तर...स्वाती मालीवाल प्रकरणात महिला आयोग आक्रमक!

खासदारांच्या दिलदार मित्रानेच चंद्रहार पाटलांचा बळी दिला; विशाल पाटलांनी कोणावर केला गंभीर आरोप

Dry Day: मायानगरीचा विकेंड कोरडाच! मुंबई आणि परिसरात 3 दिवस ड्राय डे, काय आहे कारण?

नळातून किंवा शॉवरमधून पाणी येत नसेल तर घरच्या घरी 'असे' करा दुरुस्त

SCROLL FOR NEXT