Anushka Sharma and Virat Kohli  Sakal
IPL

विराट-अनुष्का जोडीचा सेल्फी 'तिसऱ्या' गोष्टीमुळे चर्चेत

या दोघांच्या कोणत्याही फोटोला चांगला प्रतिसाद मिळत असतो हे खरं असलं तरी हा सेल्फी खास आहे.

सकाळ डिजिटल टीम

आयपीएल 2022 च्या व्यस्त कार्यक्रमातून किंग विराट कोहलीनं पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबतचा एक सेल्फी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केलाय. हा फोटो चांगलाच चर्चेत आहे. या फोटोत अनुष्का शर्मा (Anushka Sharma) मेकअपशिवायही एकदमच सुंदर दिसत आहे. दुसरीकडे विराट कोहली स्मार्ट आणि डॅशिंग लूकमध्ये दिसतोय. विराट कोहली सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) संघाची कॅप्टन्सी सोडल्यानंतर तो एक खेळाडू म्हणून याच संघाकडून खेळताना दिसते.

या दोघांच्या कोणत्याही फोटोला चांगला प्रतिसाद मिळत असतो हे खरं असलं तरी हा सेल्फी खास आहे. कारण याची चर्चा या दोघांशिवाय एका तिसऱ्याच गोष्टीवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. ती गोष्ट म्हणजे या दोघांच्या लेक वामिकाचा प्ले एरिया! सेल्फीच्या Background ला KIDS एरिया दिसून येतो. यात लहान मुलांसाठीची क्यूट बाईकही दिसून येते. बहुतेक हा परिसर वामिकाच्या खेळण्याची जागा आहे.

लाल-पिवळ्या आणि निळ्या रंगातील बॅकग्राउंडमुळे फोटोला आणखी शोभा आल्याचे काहीजण बोलत आहे. विराट कोहलीने हर्टवाली इमोजीसह खास सेल्फी शेअर केली आहे. कोहलीने इन्स्टाग्रामसह ट्विटर अकाउंटवरुनही हा फोटो शेअर केला आहे. अनेकजण या फोटोवर प्रतिक्रिया देत आहेत.

विराट कोहली आयपीएलमुळे चर्चेत असताना दुसऱ्या बाजूला अनुष्का शर्मा ' चकडा एक्स्प्रेस' या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. भारतीय महिला क्रिकेटर झूलन गोस्वामी हिच्या भूमिका अनुष्का साकारणार आहे. विराट कोहलीसोबत लग्न झाल्यापासून अनुष्का चित्रपटापासून दूर होती. आता ती महिला क्रिकेटरच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाने पुन्हा एकदा धमाकेदार एन्ट्री करण्यासाठी सज्ज आहे. काही दिवसांपूर्वीच अनुष्काने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर केला होता. यात ती व्यायामासह बॅटिंग आणि बॉलिंग करताना दिसली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Congress Merger : शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार? काँग्रेस नेत्यांकडून सूचक वक्तव्य; राहुल गांधी, खर्गे निर्णय घेणार

FDA Action: तुकाराम मुंढेंचा अ‍ॅक्शन मोड! राज्यभरात धडक कारवाई सुरूच, एका दिवसात चार कोटींचा साठा जप्त, २१ जण अटकेत

Fifa World Cup 2026 : दक्षिण कोरियाचा जबरदस्त कमबॅक; जर्मनी, पोर्तुगाल अन् आता झेकीयावर विजय, युरोपियन संघांवर दादागिरी

E22, E25, E27 पेट्रोलवर सरकारचा मोठा निर्णय! तुमच्या कार-बाईकवर काय परिणाम होणार? मायलेज, इंजिन आणि किंमतीबाबत जाणून घ्या

Hasan Mushrif Setback : हसन मुश्रीफांना दणका! गडहिंग्लज नगराध्यक्षांसह आजरा सभापतींचा जातीचा दाखला अवैध

SCROLL FOR NEXT