IPL 2023 Star Sports Broadcast esakal
IPL

IPL 2023 Star Sports Broadcast : 6230 कोटी मिनिटं! Jio च्या दणदणाटातही स्टार स्पोर्ट्सने रेकॉर्ड केले ब्रेक

अनिरुद्ध संकपाळ

IPL 2023 Star Sports Broadcast : आयपीएलच्या 16 व्या हंगामात जेवढी चर्चा चेन्नई, मुंबईच्या सामन्याची झाली नाही त्यापेक्षा जास्त चर्चा ही स्टार स्पोर्ट्स आणि जिओ सिनेमा यांच्यातील ब्रॉडकास्टिंग स्पर्धेची झाली. स्टार स्पोर्ट्स आणि पार्टनर जिओ यांच्यात प्रेक्षक खेचण्यात जोरदार रस्सीखेच सुरूआहे. मात्र BARC च्या नुकत्यात प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार स्टार स्पोर्ट्सने विक्रमी प्रेक्षक संख्येसह जोरदार मुसंडी मारली आहे.

स्टार स्पोर्ट्सने पहिल्या आठवड्यात टीव्हीवर आतापर्यंत 6230 कोटी मिनिटे व्ह्युवरशीप मिळवली आहे. ही आयपीएल इतिहासातील (कोरोना काळ वगळून) आतापर्यतची दुसऱ्या क्रमांकाची पहिल्या आठवड्यातील आकडेवारी आहे. BARC च्या डाटानुसार शहरी पुरूष स्पोर्ट्स प्रेक्षकसंख्या जवळपास 25 टक्क्यांनी वाढली आहे. स्टार स्पोर्ट्सची टीव्ही रेटिंग सुद्धा सुधारली आहे.

याबाबत बोलताना स्टार स्पोर्ट्स डिजने हॉटस्टारचे प्रमुख संजोग गुप्ता यांनी सांगितले की, 'डिजने हॉटस्टार टाटा आयपीएल 2023 चे प्रक्षेपण करत आहे. त्याला मिळणारा प्रतिसाद पाहून आम्ही भारावून गेलो आहोत. धडाकेबाज सुरूवातीनंतर आम्ही प्रेक्षकसंख्येच्या बाबतीत आमची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी सुरूच ठेवली आहे. आम्ही आयपीएल इतिहासातील हंगामाच्या पहिल्या 10 सामन्यात दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च प्रेक्षक संख्या नोंदवली आहे.'

ते पुढे म्हणाले की, 'चाहत्यांच्या स्टार स्पोर्ट्सला सातत्याने मिळणाऱ्या प्रेमाबद्दल आभारी आहोत. सलामीच्या सामन्यावेळी टीव्हीवरील सर्वोच्च प्रेक्षक संख्या ही 5.6 कोटी पर्यंत गेली होती. ही आयपीएल इतिहासातील (कोरोना काळ सोडून) सर्वोच्च प्रेक्षकसंख्या होती. यामुळे आयपीएल आणि स्टार स्पोर्ट्सची मिळून ताकद किती आहे हे दिसून येते.'

(Sports Latest News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT