IPL 2023 Closing Ceremony esakal
IPL

IPL 2023 Closing Ceremony : आयपीएलच्या सांगता समारंभात येणार दिग्गज; संपूर्ण यादी एका क्लिकवर

अनिरुद्ध संकपाळ

IPL 2023 Closing Ceremony : गेल्या दोन महिन्यापासून सुरू असलेला आयपीएलचा 16 वा हंगाम आता समाप्तीकडे सरकला आहे. एक क्वालिफायर आणि फायनल असे दोनच सामने शिल्लक आहेत. दरम्यान आयपीएलच्या चाहत्यांना रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या सांगता समारंभाचे वेध लागले आहेत. चेन्नई सुपर किंग्ज आधीच फायनलमध्ये पोहचली आहे. आज चेन्नईसोबत मुंबई खेळणार की गुजरात हे ठरणार आहे.

दरम्यान, आयपीएलने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून फायनलपूर्वी होणाऱ्या सांगता समारंभाला कोणते कलाकार येणार याची माहिती दिली आहे. ट्विटनुसार प्रसिद्ध रॅपर किंग आणि डीजे न्युक्लिया हा मुख्य आकर्षण असणार आहे. त्याचबरोबर त्याला साथ देण्यासाठी गायक डिवाईन आणि जोनिता गांधी देखील असणार आहेत.

आयपीएलची यंदाची फायनल खूप रंजक असणार आहे. गतविजेत्या गुजरातसमोर क्वालिफायर 2 सामन्यात मुंबईचे तगडे आव्हान असणार आहे. जर गुजरात जिंकली तर त्यांना सलग दुसऱ्या वर्षी आयपीएल जिंकण्याची संधी असणार आहे. सलग दोन हंगामात आयपीएलचे विजेतेपद पटकावण्याची कामगिरी फक्त दोन संघांनाच करता आली आहे. चेन्नई सुपर किंग्ज जी आधीच फायनलमध्ये पोहचली आहे. आणि दुसरी म्हणजे मुंबई इंडियन्स आज हीच मुंबई गुजरातला त्यांच्यात होम ग्राऊंडवर भिडणार आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti Protest : कोयना धरणात ८५ टीएमसी पाणी असतानाही कृष्णा नदी कोरडीच; राजू शेट्टी यांचे ठिय्या आंदोलन

IND vs NZ 2nd T20I Live: १,४३४ दिवसानंतर विकेट! भुवनेश्वर कुमारची कमाल, पण अर्शदीप सिंगचा मोठा विक्रम! टीम इंडियाचाही पराक्रम

8th Pay Commission: किमान वेतन ७२ हजारांपर्यंत वाढविण्याची वेतन आयोगाच्या मुंबईतील दोन दिवसीय बैठकीत मागणी

Latest Marathi News Live Update : पुणे शहरात बिबट्याचे दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Video: केंब्रिजमधील त्या रेस्टॉरंटमध्ये काय घडलं? सोनिया गांधींनी सांगितली राजीव गांधींसोबतची पहिल्या भेटीची आठवण

SCROLL FOR NEXT