IPL 2024 Babar Azam  esakal
IPL

IPL 2024 : जागे व्हा! बाबर, शाहीन आयपीएलमध्ये...स्वप्न पाहणाऱ्यांची हरभजनने काढली खरडपट्टी

IPL 2024 Babar Azam : विषय पाकिस्तानचा असेल तर हरभजन सिंग शाब्दिक मारा देखील सढळ हातानेच करतो.

अनिरुद्ध संकपाळ

IPL 2024 Harbhajan Singh Reply Babar Azam IPL jerseys Photo : पाकिस्तानचे क्रिकेटपटू बाबर आझम, शाहीन अफ्रिदी आणि मोहम्मद रिझवान यांचा आयपीएल जर्सीतील फोटो व्हायरल झाले. यानंतर पाकिस्तानमधील एका चाहत्याने हे फोटो शेअर करत दोन्ही देशातील चाहते हे खेळाडू सर्वात श्रीमंत लीगमध्ये खेळण्याची स्वप्न पाहत आहेत.

यावर हरभजन सिंगने कडक शब्दात प्रतिक्रिया देत या चाहत्याला गप्प बसवलं. सोशल मीडिया पोस्ट असो वा मैदानावरील सामना असो हरभजन पाकिस्तानविरूद्ध काही असलं तर तो शांत बसत नाही. हरभजनच्या या प्रतिक्रियेमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजनैतिक संबंधांमुळे दोन्ही देशांमधील क्रिकेट संबंध देखील ताणले गेले आहे. 26/11 च्या मुंबई हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचे संबंध तोडून टाकले. त्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंवर आयपीएल खेळण्यावर बंदी घालण्यात आली.

गेल्या 16 वर्षात अनेक प्रतिभाशाली विदेशी खेळाडू दर वर्षी आयपीएल खेळण्यासाठी भारतात येतात. आयपीएल ही सर्वात श्रीमंत आणि सर्वात मोठी क्रिकेट लीग आहे. पाकिस्तानी खेळाडू देखील आयपीएलमध्ये खेळायला मिळावे अशी इच्छा बाळगून असणं सहाजिकच आहे.

पाकिस्तानचे चाहते देखील बाबर आझम आणि शाहीन अफ्रिदी यासारखे खेळाडू आयपीएल लिलावात कशी कामगिरी करतात. त्यांची लिलावातील किंमत किती याबाबत उत्सुक असतील.

मात्र हरभजनने पाकिस्तानी चाहत्यांना कडक शब्दात सुनावत त्यांचा हिरमोड केला. हरभजन ट्विट करून म्हणाला की, 'कोणत्याही भारताला असे स्वप्न पडत नाही... तुम्ही लोकं अशी स्वप्नं पाहणं सोडून द्या. आता जागे व्हा!'

(IPL Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: सोशल मीडियावरील TRP ला तुमचे यश समजण्याची चूक करू नका; सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा कुणाला सल्ला?

Radhanagari Dam Water Level : गगनबावड्यासह 12 धरण क्षेत्रांत अतिवृष्टी; राधानगरी धरणात 85 टक्के पाणीसाठा, कोल्हापूर जिल्ह्यातील 21 बंधारे पाण्याखाली

Latest Marathi Update : राहुल गांधींची मोदींवर टीका; 'शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केली, धर्मेंद्र प्रधानांना हटवा'

PM Narendra Modi On Paper Leak : पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! पेपरफुटीच्या प्रकरणांची फास्ट ट्रॅक कोर्टात होणार सुनावणी

Ujani Dam: उजनी धरणातील आवक १२,७९७ क्युसेकवर; उपयुक्त पाणीसाठा ५४ टक्के, धरणातून ५,५७० क्युसेक विसर्ग कायम

SCROLL FOR NEXT