ICC Stop Clocks Rule : आयसीसीचा नवा 'स्टॉप क्लॉक' नियम आहे तरी काय, कधीपासून होणार अंमलबजावणी?

ICC Stop Clocks Rule
ICC Stop Clocks Ruleesakal

ICC Stop Clocks Rule : आयसीसीने मर्यादित षटकांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात आता षटकांच्या मधे स्टॉप क्लॉक नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. आज आयसीसी वार्षिक बोर्ड मिटिंगमध्ये पुरूष टी 20 वर्ल्डकप 2024 चे नियम आणि 2026 च्या पात्रता फेरीची प्रक्रिया देखील या बैठकीत जाहीर करण्यात आली.

जूनमध्ये होणाऱ्या टी 20 वर्ल्डकप पासून आयसीसी स्टॉप - क्लॉक नियम लागू करणार आहे. हा नियम वनडे आणि टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी असेल.

ICC Stop Clocks Rule
Yashasvi Jaiswal: 'विशीत कोण ऐकतं...', गावसकरांनी ऐकवला इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेपूर्वी जैस्वालला रागावल्याचा किस्सा

डिसेंबर 2023 मध्ये आयसीसीने स्टॉप क्लॉक नियमाची चाचपणी केली होती. त्यांनी पुरूषांच्या काही मर्यादित षटकांच्या सामन्यात याची ट्रायल घेतली होती. ही चाचपणी एप्रिल 2024 पर्यंत सुरू होती. त्याचा अभ्यास झाल्यानंतर आता हा नियम पूर्णपणे अंमलात आणला जाणार आहे.

ट्रायलमध्ये या नियमामुळे जवळपास वनडे सामन्याची जवळपास 20 मिनिटे वाचतात. आता हा नियम पूर्ण सदस्य असलेल्या संघांमधील वनडे आणि टी 20 सामन्यांदरम्यान वापरण्यात येणार आहे. हा नियम 1 जून 2024 पासून लागू होणार आहे.

स्टॉप क्लॉक नियम काय आहे?

स्टॉप क्लॉक नियमानुसार मर्यादित षटकांच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला आधीचे षटक संपल्यानंतर नवीन षटक हे 60 सेकंदाच्या आत सुरू करावी लागणार आहे.

सामन्यादरम्यान इलेक्ट्रॉनिक घड्याळ हे शुन्यापासून 60 सेकंदापर्यंत वेळ मोजेल. हे घड्याळ ग्राऊंडवर डिस्प्ले केलं जाईल. हे घड्याळ सुरू करण्याचं काम हे तिसऱ्या अंपायरचं असेल.

जर क्षेत्ररक्षण करणारा संघ नवे षटक 60 सेकंदात सुरू करू शकला नाही तर त्या संघाला दोन वॉर्निंग देण्यात येईल. जर तरी देखील नियमाचं उल्लंघन झालं तर पेनाल्टी म्हणून प्रतिस्पर्धी संघाला 5 धावा दिल्या जातील.

ICC Stop Clocks Rule
Mumbai Cricket: 'तुमच्यासारखा कुलकर्णी येणार नाही...', श्रेयस, शार्दुलसह मुंबईच्या खेळाडूंकडून धवलला मराठीतून शुभेच्छा

या नियमाला काही अपवाद देखील आहेत.

- ज्यावेळी षटकाच्या दरम्यान नवीन फलंदाज मैदानावर येत असेल त्यावेळी हा नियम लागू असणार नाही.

- जर मैदानावर फलंदाज किंवा क्षेत्ररक्षक दुखापतग्रस्त झाला आणि त्याच्यावर उपचार सुरू असतील तर हा नियम लागू होणार नाही.

- जर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामुळे नाही तर काही अपरिहार्य कारणामुळे षटक सुरू करण्यास दिरंगाई होत असेल तर हा नियम लागू होणार नाही.

आयसीसीने वेस्ट इंडीज आणि अमेरिका येथे होणाऱ्या टी 20 वर्ल्डकप 2024 मध्ये सेमी फायनल आणि फायनल सामन्यासाठी राखीव दिवस ठेवल्याचे देखील सांगितले.

तसेच वर्ल्डकपच्या ग्रुप स्टेज आणि सुपर 8 फेरीतील सामन्याचा निकाल लावण्यासाठी दुसऱ्या डावात किमान 5 षटके होणे गरजेचे आहे. तर बाद फेरीतील सामन्यासाठी हा दुसऱ्या डावात किमान 10 षटकांचा खेळ होणे गरजेचे असणार आहे.

आयसीसीने 2026 टी 20 वर्ल्डकपच्या पात्रता फेरीची रूपरेषा देखील जाहीर केली. 20 संघामध्ये होणारी ही स्पर्धा भारत आणि श्रीलंका येथे होणार आहे. 2026 च्या वर्ल्डकपसाठी 12 संघ थेट प्रवेश करतील. यातील 2024 च्या वर्ल्डकपचे टॉपचे 8 संघ आणि रँकिंगद्वारे इतर संघ निवडले जातील उर्वरित आठ जागांसाठी विभागवार पात्रता फेरी होईल.

(Cricket News In Marathi)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com