jiocinema viewership-touches-more-than-2-crores-during-csk-vs-rajasthan-royals-match-ipl-2023  
IPL

IPL 2023: धोनीमुळे झाला JIO चा मोठा रेकॉर्ड, CSK-RR चा सामना तब्बल इतक्या कोटी लोकांनी पाहिला

सामन्याच्या शेवटच्या षटकात सीएसकेला विजयासाठी 21 धावा करायच्या होत्या यादरम्यान MS धोनीने 2 षटकार ठोकले अन्...

Kiran Mahanavar

आयपीएल 2023 मध्ये Jio Cinema ने प्रेक्षकसंख्येचा नवा विक्रम केला आहे. टी20 लीगच्या चालू हंगामातील 17 वा सामना बुधवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला.

सामन्याच्या शेवटच्या षटकात सीएसकेला विजयासाठी 21 धावा करायच्या होत्या आणि यादरम्यान एमएस धोनीने 2 षटकार ठोकले. यावेळी जवळपास 2.2 कोटी चाहते जिओ सिनेमावर सामना पाहत होते. चालू हंगामातील हा सर्वाधिक विक्रम आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने प्रथम खेळताना 175 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात CSK संघ केवळ 172 धावाच करू शकला.

JioCinema वरील चाहत्यांची संख्या Disney Hotstar पेक्षा खूप जास्त आहे. IPL पहिल्यांदाच Jio सिनेमावर स्ट्रीम होत आहे. पण गेल्या मोसमापेक्षा ते जास्त चाहते आकर्षित करत आहेत. इतकंच नाही तर स्ट्रीमिंग अॅपला दररोज नवीन व्ह्यूअर्सही मिळत आहेत.

2019 सीझनच्या अंतिम सामन्यात डिस्ने हॉटस्टारला सर्वाधिक 1.86 कोटी व्ह्यूअर्स मिळाले होते. पण CSK आणि रॉयल्स यांच्यातील सामन्याने हा विक्रम खूप मागे टाकला आहे.

आयपीएल 2023चे मोफत स्ट्रीमिंग JioCinema वर भारतात होत आहे. त्यामुळे पहिल्या आठवड्यात विक्रमी 550 कोटी व्ह्यूज मिळाले आहे. आयपीएलमधील आतापर्यंतचा सर्वात जास्त पाहिला जाणारा ओपनिंग आठवडा होता.

या दरम्यान JioCinema हे इतर अॅपपेक्षा जास्त इन्स्टॉल करण्यात आले. प्रायोजकत्व आणि जाहिरातदारांच्या बाबतीतही JioCinema आयपीएलचे टीव्ही हक्क विकत घेतलेल्या चॅनलपेक्षा खूप पुढे गेले आहे. स्ट्रीमिंग अॅपने देशातील बहुतांश शीर्ष ब्रँडसह 23 प्रमुख खेळांशी करार केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, MI vs RCB : बंगळुरूने मारलं वानखेडेचं मैदान, मिळवला तिसरा विजय; मुंबई इंडियन्सची पराभवाची हॅट्रिक

IPL 2026: मुंबई इंडियन्सचं काय चुकतंय? RCB विरूद्धच्या पराभवानंतर हार्दिक पांड्याने स्पष्टच सांगितलं

CM Fund: आगाऊ ३०% रक्कम, ८ तासांत निर्णय अन्...; मुख्यमंत्री सहायता निधी प्रक्रियेत ऐतिहासिक बदल, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

MI vs RCB: रोहित शर्माने IPL मध्ये मोठा विक्रम रचला, पण आऊट न होताही अचानक का सोडलं मैदान? मुंबई इंडियन्सने सांगितलं कारण

दुसरी, तिसरी, चौथीचा बदलणार अभ्यासक्रम! नवीन अभ्यासक्रमासाठी ४ मेपासून शिक्षकांचे प्रशिक्षण, ३० मेपर्यंत तीन टप्प्यात शिक्षकांचे प्रशिक्षण, वाचा...

SCROLL FOR NEXT