IPL 2023 : अश्विन आण्णाला रहाणेचेच त्याच्याच पद्धतीने प्रत्युत्तर, भर मैदानात दोघांमध्ये ड्रामा

IPL 2023 : अश्विन आण्णाला रहाणेचेच त्याच्याच पद्धतीने प्रत्युत्तर, भर मैदानात दोघांमध्ये ड्रामा

IPL 2023 : जेव्हा जेव्हा नॉन-स्ट्राइक एंडवर धावबाद होण्याची वेळ येते तेव्हा रविचंद्रन अश्विनच नाव आधी येते. काही दिवसांपूर्वी आरसीबी आणि लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात झालेल्या सामन्यात या प्रकरणावरुन बराच वाद झाला होता. आता बुधवारी रात्री चेन्नई आणि राजस्थानच्या सामन्यातही असाच काहीसा प्रकार घडला. सहाव्या षटकात रविचंद्रन अश्विन पहिल्यांदा गोलंदाजी करायला आला. अजिंक्य रहाणे स्ट्राईकवर तर डेव्हॉन कॉनवे नॉन स्ट्राईक एंडवर होता.

IPL 2023 : अश्विन आण्णाला रहाणेचेच त्याच्याच पद्धतीने प्रत्युत्तर, भर मैदानात दोघांमध्ये ड्रामा
IPL 2023: पराभवाची जबाबदारी यांचीच! धोनीने कोणाच्या डोक्यावर फोडलं खापर?

षटकाचा दुसरा चेंडू टाकत असताना अश्विन अचानक थांबला आणि चेंडू टाकला नाही. अश्विन नॉन-स्ट्रायकरच्या शेवटी फलंदाजाला सावध करण्यासाठी अशा युक्त्या करतो, परंतु यावेळी त्याचा हेतू पूर्णपणे वेगळा होता. त्याला रहाणेचा प्लॅन पाहायचा होता. पुढच्या चेंडूवर अश्विन पुन्हा रनअपवर गेला, पण आता फलंदाजाला चकित करण्याची पाळी होती, अश्विनने चेंडू सोडण्याआधीच रहाणे स्टंप सोडून बाजूला गेला.

IPL 2023 : अश्विन आण्णाला रहाणेचेच त्याच्याच पद्धतीने प्रत्युत्तर, भर मैदानात दोघांमध्ये ड्रामा
IPL 2023: शेवटच्या चेंडूवर धोनीच्या CSKचा पराभव करणाऱ्यासाठी संजूला मोजावे लागले लाखो रुपये

अजिंक्य रहाणे आजुन एक चेंडू खेळत रविचंद्रन अश्विनचा आदर केला, पण पुढचा चेंडूवर त्याने षटकार ठोकला. मात्र या अपमानाचा बदला अश्विनने 10व्या षटकात घेतला. तिसऱ्या चेंडूवर त्याने अजिंक्य रहाणेला एलबीडब्ल्यू आऊट केले. रहाणेने अश्विनची शिकार करण्याची ही पाचवी वेळ होती.

IPL 2023 : अश्विन आण्णाला रहाणेचेच त्याच्याच पद्धतीने प्रत्युत्तर, भर मैदानात दोघांमध्ये ड्रामा
IPL 2023 : "कितीही प्लॅन बनवले तरी धोनी मैदानात आला की सगळं होतं फेल पण..."

रॉयल्सच्या 176 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जला सलामीवीर डेव्हॉन कॉनवेने चांगली सुरुवात करून दिली. मधल्या फळीतील अपयशानंतर महेंद्रसिंग धोनी (17 चेंडूत नाबाद 32, एक चौकार, तीन षटकार) आणि रवींद्र जडेजा (15 चेंडूत नाबाद 25, एक चौकार, दोन षटकार) यांनी 59 धावांची अखंड भागीदारी केली. शेवटच्या षटकात विजयासाठी 21 धावा आणि शेवटच्या चेंडूवर पाच धावा हव्या होत्या, पण महेंद्रसिंग धोनीला षटकार मारता आला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com