RCB Captain Faf Du Plessis Statement After Humiliating defeat Against Mumbai  Esakal
IPL

MI vs RCB IPL 2024 : आमच्या धावा 'अतीसामान्य', हा पराभव गिळणं... बोलता बोलता फाफनं बुमराहला दिली ऑफर

अनिरुद्ध संकपाळ

Faf Du Plessis Statement MI vs RCB IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 25 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर बंगळुरूचा 7 विकेट्स आणि 27 चेंडू राखून पराभव केला. मुंबई इंडियन्सने आरसीबीचे 197 धावांचे आव्हान 15.3 षटकातच पार केलं. मुंबईकडून इशान किशनने 69 तर सूर्यकुमार यादवने 19 चेंडूत 52 धावांची धडाकेबाज खेळी केली.

आरसीबीकडूनही काही चांगल्या खेळी झाल्या. फाफ ड्युप्लेसिसने 40 चेंडूत 61 धावांची, रजत पाटीदारने 26 चेंडूत 50 धावांची खेळी केली. तर दिनेश कार्तिकने 23 चेंडूत नाबाद 53 धावांची खेळी केली. मात्र तरी देखील आरसीबीला मोठ्या अपमानजनक पराभवाला सामोरं जावं लागलं.

या पराभवानंतर आरसीबीचा कर्णधार फाफ ड्युप्लेसिसने आपल्या पराभवाची कारणं सांगितले. तो सामन्यानंतर झालेल्या कार्यक्रमात बोलताना म्हणाला की, 'हा पराभव गळ्यातून खाली उतवणं अवघड जणार आहे. दोन गोष्टी फार महत्त्वाच्या ठरल्या. दव पडल्यानं ओलं झालेलं मैदान आणि दुसरी गोष्ट म्हणजे नाणेफेक!

मला कोणत्या परिस्थितीत नाणेफेक जिंकावीच लागणार आहे. त्यांनी चांगला खेळ केला. त्यांनी आमच्यावर दबाव टाकला अन् आम्हाला चुका करायला भाग पाडलं. आम्हाला माहिती होतं की दव पडणार आहे. आम्हाला जवळपास 250 पेक्षा जास्ता धावा करणं गरजेचं होतं. त्यांनी आमच्या 196 धावा फार खुज्या असल्याचं दाखवून दिलं.

तुम्हाला दव पडणार आहे हे माहिती असतं त्यावेळी तुम्हाला मोठी धावसंख्या उभारणं गरजेचं असतं. दव पडल्यामुळे आमचे गोलंदाज संघर्ष करत होते. आम्ही सामन्यातील महत्त्वाच्या क्षणी कच खाल्ली. मी आणि रजत खेळत असताना चांगली भागीदारी झाली होती. मात्र त्यांनी सामन्यात जोरदार पुनरागमन केलं.

जसप्रीत बुमराहला दिली ऑफर

जसप्रीत बुमराह ज्या ज्यावेळी गोलंदाजीला आला त्या त्यावेळी त्यानं आमच्यावरील दबाव वाढवला. तो एकाच अॅक्शनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू टाकू शकतो. तो लसिथ मलिंगाच्या मार्गदर्शनाखाली उत्तम कामगिरी करतोय. जर तो आमच्या संघाचा भाग झाला तर आम्हाला नक्कीच आवडेल.

आम्हाला आमची गोलंदाजी कमकवूत आहे हे माहिती आहे. मात्र आम्हाला फलंदाजीद्वारे यावर मात करावी लागेल. आम्हाला थोडं कल्पक व्हावं लागेल. तसेच फलंदाजी करताना थोडं अजून आक्रमक खेळालयला हवं. विशेषकरून पहिल्या 4-5 षटकात जास्त धावा करायला हव्यात.'

(IPL 2024 Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav DJ Ban : पुण्यात डीजेवर बंदी येणार? गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाद आणखी चिघळला; पोलिस उपायुक्तांनी केला खुलासा

TVKच्या नेत्याला पाठलाग करत क्रूरपणे संपवलं, कोयत्याने सपासप वार; मृत्यूनंतरही वार करतच राहिले, घटना CCTVत कैद

महात्मा गांधींच्या भूमिकेत दिसणार मनोज बाजपेयी; १० किलो वजन घटवलं, नवा लूक पाहून चाहते शॉक

Marathi News Live Updates : माजलगावच्या कॅनॉलमध्ये अज्ञात मृतदेह पाईपलाइनला अडकला

Chinchwad Electricity ट्रान्सफर्मरला आग, चिंचवड, वाल्हेकरवाडीसह रावेत परिसरात वीजपुरवठा खंडित; आगीचा VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT