IPL 2024 MI vs RCB : मुंबईने 15 षटकातच आव्हान पार करत केला RCB चा कडबा! इशाननंतर सूर्या अन् हार्दिकनं धुतलं

Mumbai Indians Vs Royal Challengers Bengaluru Scorecard Updates : आयपीएल 2024 चा 25 वा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला.
MI defeat RCB in IPL 2024
MI defeat RCB in IPL 2024 esakal

Mumbai Indians Vs Royal Challengers Bengaluru :

मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेजर बंगळुरूचा 7 विकेट्स राखून पराभव करत गुणतालिकेत सातव्या स्थानावर झेप घेतली आहे. तर आरसीबी पाचव्या पराभवानंतर नवव्या स्थानावर घसरली आहे. मुंबईने बंगळुरूचे 197 धावांचे आव्हान 3 फलंदाजांच्या मोबदल्यात 15.3 षटकातच पार केलं. मुंबईकडून इशान किशनने धडाकेबाज सुरूवात करत 34 चेंडूत 69 धावा ठोकल्या. तर सूर्यकुमार यादवनं 19 चेंडूत 52 धावा केल्या. हार्दिक पांड्याने 6 चेंडूत 21 धावांचे योगदान दिले.

IPL 2024 MI vs RCB Live Score : बुमराहचा पंजा तर कार्तिकचा षटकारांचा चौकार; आरसीबीनं मुंबईसमोर ठेवलं 197 धावांच आव्हान

जसप्रीत बुमराहने आरसीबीचा निम्मा संघ गारद केला. मात्र त्यानंतर शेवटच्या षटकांमध्ये दिनेश कार्तिकने फटकेबाजी करत 23 चेंडूत नाबाद 53 धावांची खेळी केली. यात 4 षटकार आणि 5 चौकारांचा समावेश होता. आरसीबीच्या तीनच फलंदाजांनी डबल डिजीट ओलांडली मात्र तिघांनाही अर्धशतकी खेळी केल्याने आरसीबीने 20 षटकात 8 बाद 196 धावांपर्यंत मजल मारली.

IPL 2024 MI vs RCB Live Score : बुमराहने फाफची खेळी संपवली; आरसीबी स्लॉग ओव्हरमध्ये अडचणीत

जसप्रीत बुमराहने फाफ ड्युप्लेसिसची 61 धावांची खेळी संपवली. त्यानंतर महिपाल लोमरोला देखील शुन्यावर बाद करत हॅट्ट्रिक संधी निर्माण केली. यामुळे दिनेश कार्तिक एकाकी पडला. आरसीबीच्या 17 षटकात 6 बाद 154 धावा झाल्या होत्या.

IPL 2024 MI vs RCB Live Score : रजत पाटीदार अर्धशतकानंतर माघारी, कॉट्झीनं फोडली जोडी

आतापर्यंत हंगामात फेल गेलेल्या रजत पाटीदारची अखेर बॅट तळपली. रजत पाटीदारनं 26 चेंडूत अर्धशतक ठोकलं. मात्र जेराल्ड कॉट्झीनं त्याला बाद करत ड्युप्लेसिस आणि रजतची 82 धावांची भागीदारी फोडली. त्यानंतर श्रेयस गोपालनं मॅक्सवेलला भोपळाही फोडू दिला नाही. यामुळे आरसीबीची अवस्था 2 बाद 105 धावांवरून 4 बाद 108 धावा अशी झाली.

IPL 2024 MI vs RCB Live Score : फाफ ड्युप्लेसिस अन् रजत पाटीदारची अर्धशतकी भागीदारी, आरसीबीनं डाव सावरला

पॉवर प्लेमध्ये दोन धक्के बसल्यानंतर आरसीबीने आपला डाव सावरला. कर्णधार फाफ ड्युप्लेसिस आणि रजत पाटीदार यांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी रचली. यामुळे आरसीबीने 10 षटकात 89 धावांपर्यंत मजल मारली.

पॉवर प्लेमध्येच आरसीबीला दोन धक्के 

मुंबई इंडियन्सने आरसीबीला पॉवर प्लेमध्येच दोन धक्के दिले. बुमराहने विराट कोहलीची शिकार केली तर आकाश माधवालने विल जॅकला 8 धावांवर बाद केलं. त्यानंतर फाफ ड्युप्लेसिस आणि रजत पाटीदार यांनी आरसीबीला 6 षटकात 44 धावांपर्यंत पोहचवलं.

IPL 2024 MI vs RCB Live Score : हार्दिक पांड्यानं नाणेफेक जिंकली,

हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आरसीबीकडून विल जॅक पदार्पण करणार आहे. महिपाल आणि वैशाक देखील आरसीबी संघात असणार आहेत. मुंबईने देखील संघात एक बदल केला असून श्रेयस गोपाल हा पियूष चावलाच्या ऐवजी संघात आला आहे.

आयपीएलच्या 25 व्या सामन्यात भिडणार MI अन् RCB

आयपीएलच्या 25 व्या सामन्यात आज आरसीबी आणि मुंबई इंडियन्स हे दोन स्टार संघ भिडणार आहेत. विराट कोहली आणि रोहित शर्मा जवळपास तीन महिन्यांना एकत्र मैदानात दिसणार. मात्र ते प्रतिस्पर्धी असणार आहेत.

IPL 2024 MI vs RCB Live Score : वानखेडेवर रोहित शर्मावर भारी पडणार विराट... किती वाजता रंगणार सामना?

वानखेडेवर आज रोहित शर्मा आणि विराट कोहली मैदानात उतरणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सध्यांकाळी 7 : 30 वाजता रंगणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com