IPL 2024 Robin Minz esakal
IPL

IPL 2024 Robin Minz : आयपीएलमधील पहिला आदिवासी खेळाडू रॉबिन संपूर्ण हंगामालाच मुकणार; नेहराने सांगितले कारण

IPL 2024 Robin Minz Bike Accident : आशिष नेहराने आयपीएल लिलावात बोली लागलेल्या पहिल्या आदिवासी खेळाडू रॉबीन मिंझबाबत एक मोठी अपडेट दिली आहे.

अनिरुद्ध संकपाळ

IPL 2024 Robin Minz : आयपीएल 2024 मध्ये पहिला आदिवासी खेळाडू खेळणार होता. झारखंडचा रॉबिन मिंझ याला गुजरात टायटन्सने लिलावात बोली लावत आपल्या गोटात खेचले होते. मात्र तो आता संपूर्ण हंगामाला मुकणार आहे. गुजरात टायटन्सचा प्रशिक्षक आशिष नेहराने सांगितले की त्याला बाईक अपघातात दुखापत झाली आहे. त्यामुळे तो संपूर्ण हंगामाला मुकणार आहे.

रॉबिनला गुजरात टायटन्सने आयपीएल 2024 च्या मिनी लिलावात 3.60 कोटी रूपये बोली लावत आपल्या संघात सामील करून घेतले. मात्र त्याला आता अपघातामुळे संपूर्ण हंगामाला मुकावे लागणार आहे. सुपर बाईकवरील त्याचे नियंत्रण सुटल्याने त्याचा अपघात झाला होता.

रॉबिन मिंझ हा आयपीएलमधील पहिला आदिवासी खेळाडू आहे. तो झारखंड येतील गुमला जवळ आपल्या कावासाकी बाईकवरून जात होता. त्यावेळी त्याचे बाईकवरील नियंत्रण सुटले. त्याला गंभीर दुखापत झाली नसल्याचे त्याचे वडील फ्रान्सिस मिंझ यांनी सांगितले.

मात्र रॉबिन मिंझ हा आयपीएल 2024 च्या हंगामात खेळू शकणार नाही असं चित्र निर्माण झालं आहे. संघाचा प्रशिक्षक आशिष नेहराने आज सांगितेल की मिंझला दुखापतीतून सारवण्यासाठी अजून बराच वेळ लागणार आहे. त्यामुळे तो आयपीएल 2024 मध्ये सहभागी होऊ शकत नाही.

गुजरात टायटन्स संघ :

डेव्हिड मिलर, शुभमन गिल (कर्णधार), मॅथ्यू वेड, वृद्धिमान साहा, केन विल्यमसन, अभिनव मनोहर, बी. साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, विजय शंकर, जयंत यादव, राहुल तेवतिया, मोहम्मद शमी, नूर अहमद, साई केश , राशिद खान, जोशुआ लिटल, मोहित शर्मा, अजमतुल्ला ओमरझाई, उमेश यादव, शाहरुख खान, सुशांत मिश्रा, कार्तिक त्यागी, मानव सुथार, स्पेन्सर जॉन्सन, रॉबिन मिंझ.

(IPL News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Update : पुणे -मुंबई जुना महामार्गावर वंचित कडून रास्ता रोको

रवी शास्त्रींनी निवडला भारत-इंग्लंडचा All Time XI संघ; धोनी कर्णधार, तर गांगुलीला मात्र...

Anganwadi Nutrition: अंगणवाडीत नोव्हेंबरपासून मिळणार ‘व्हेज पुलाव’; कुपोषणाविरुद्ध पाऊल, पोषण आहार झाला अधिक रुचकर

Ambabai Temple Restoration : ब्रेकर आणि ग्राईंडरचा वापर! अंबाबाई मंदिराच्या संवर्धनात मोठी हेरफेर; पुरातत्त्व विभागाविरोधात हिंदुत्‍ववादी संघटनांसह सर्वपक्षीय आक्रमक

Mumbai Girl Stops Police Van : मुंबईच्या पोरी जिगरबाज! पोरांना अटक केलेली पोलीस व्हॅन पोरीनं अडवली; व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT