IPL 2024 Virat Kohli RCB ESAKAL
IPL

IPL 2024 Virat Kohli RCB : विराटच्या आगमनापेक्षा त्याच्या टी-शर्टचीच जोरदार चर्चा; RCB मध्ये दाखल होताच खास स्वागत

अनिरुद्ध संकपाळ

IPL 2024 Virat Kohli RCB : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली अखेर मोठ्या ब्रेकनंतर क्रिकेटच्या मैदानावर परतण्यासाठी सज्ज झाला आहे. विराट कोहली आरसीबीच्या कॅम्पमध्ये कधी येणार अशी चर्चा सर्वजण करत होते. अखेर विराट कोहलीचं विमान लँड झालं. मात्र विराटच्या आगमनापेक्षा त्याने घातलेल्या टी-शर्टचीच जोरदार चर्चा सुरू आहे.

'वडील' विराट कोहली

विराट कोहली आज बंगळुरूच्या विमानतळावर पोहचला. विराट कोहलीने आगमनावेळी एक साधा पांढरा टी-शर्ट घातला होता. मात्र या टी-शर्टवरील एका शब्दाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या टी-शर्टवर डॅड असं लिहीलं होतं. टी-शर्टवर कार्टून आणि डॅड लिहिलं होतं. चाहत्यांनी विराटने मुलगी वामिका आणि मुलगा अकाय यांच्यावरील प्रेम दर्शनवण्यासाठी हा टी-शर्ट घातल्याचा अंदाज बांधला आहे.

आरसीबीच्या चाहत्यांना यंदाच्या हंगामात संघाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. महिलांच्या आरसीबी संघाने WPL चे विजेतेपद पटकावून आरसीबीच्या कपाटात पहिली ट्रॉफी जमा केली आहे. आता आरसीबीच्या पुरूष संघाकाडून आयपीएल जिंकण्याची अपेक्षा केली जात आहे. दरम्यान 19 मार्चला चिन्नास्वामी स्टेडिमवर RCB Unbox 2024 हा कार्यक्रम होणार आहे. चाहत्यांना आरसीबीच्या नव्या जर्सीची उत्सुकता लागून राहिली आहे.

आयपीएलनंतर लगेचच टी 20 वर्ल्डकप सुरू होणार आहे. त्यामुळे भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी अनेक खेळाडू इच्छुक आहेत. विराट कोहलीला देखील संघातील आपलं स्थान पक्क करण्यासाठी आयपीएल 2024 महत्वाची आहे. विराट कोहली आता चांगल्या फॉर्ममध्ये आहे. विराट कोहली क्रिकेटच्या मैदानावर परतल्याने मैदानावर आणि चाहत्यांमध्ये देखील सळसळता उत्साह पहावयास मिळणार आहे.

(IPL Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaysingpur Heavy Rain : जयसिंगपुरात ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार; घरांमध्ये पाणी, कोल्हापूर-सांगली महामार्गावर फूटभर पाणी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाकडे शासनाचे दुर्लक्ष; स्मारकासाठी मंजूर केलेला दोन कोटींचा निधी गेला कुठं?

Burnt Cash Found Kolkata : पश्चिम बंगालमध्ये कोट्यवधींच्या जळालेल्या नोटा सापडल्याने खळबळ! सुटकेसमध्ये भरलेला पैसा; टीएमसी नेत्याशी काय आहे कनेक्शन?

रोटरी क्लबच्या 'गिफ्ट ऑफ लाइफ'चा चमत्कार! ८५० मुलांच्या हृदयावर मोफत शस्त्रक्रिया; सुनील गावस्कर भावूक

Shendurwada News : डॉ. प्रशांत पटारे यांचा रोबोटिक शस्त्रक्रियांचा विक्रम! एका दिवसात १६ रोबोटिक शस्त्रक्रिया; आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद....

SCROLL FOR NEXT