James Anderson Retirement esakal
क्रीडा

James Anderson Retirement : इंग्लंडचा स्विंग मास्टर 41 वर्षाचा अँडरसन निवृत्तीबाबत म्हणतो; अ‍ॅशेस नंतरही...

अनिरुद्ध संकपाळ

James Anderson Retirement : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेली अ‍ॅशेस मालिका आता अंतिम टप्प्यात आली आहे. मालिकेतील पाचवा कसोटी आणि शेवटचा कसोटी सामना ओव्हलवर खेळवला जात आहे. या कसोटी सामन्यात इंग्लंडचा सर्वात अनुभवी आणि सर्वाधिक विकेट घेणार गोलंदाज जेम्स अँडरसनचा देखील प्लेईंग 11 मध्ये समावेश करण्यात आला.

त्याच्या संघातील प्रवेशानंतर 41 वर्षाचा हा स्विंग मास्टर पाचव्या अ‍ॅशेस कसोटीनंतर निवृत्ती घेणार अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र या चर्चेचेला आता खुद्द जेम्स अँडरसनने प्रत्युत्तर दिले आहे. त्याने सांगितले की मी पाचव्या अ‍ॅशेस कसोटीनंतर निवृत्ती घेणार नाहीये. मी अजून माझ्या संघासाठी बरंच योगदान देऊ शकतो. जेम्स अँडरसन रविवारी 41 वर्षाचा होईल.

यंदाच्या अ‍ॅशेस मालिकेत त्याला आतापर्यंत फक्त 5 विकेट्स घेता आल्या आहेत. मात्र त्याच्या मते त्याने खराब गोलंदाजी केलेली नाही. बीसीसीशी बोलताना अँडरसन म्हणाला की, 'मला नाही वाटत की मी खराब गोलंदाजी केली आहे किंवा माझा वेग कमी झाला आहे. मला वाटते की मी अजून संघासाठी बरेच योगदान देऊ शकतो. (Ashes Series 2023)

अँडरसन पुढे म्हणाला की, 'निवृत्तीबाबत बोलायचं झालं तर मी निवृत्ती लगेच घेणार नाहीये. मी अजून बरेच काही करू शकतो. तुम्ही तुमचा बॅड पॅच मोठ्या स्पर्धेत येऊ नये अशी प्रार्थना करत असता. मात्र माझ्यासोबत हे होत आहे. तसेही माझ्याकडे संघासाठी काहीतरी करण्याची अजून एक संधी आहे. मी पाचव्या कसोटीत चांगली गोलंदाजी करून काही विकेट्स घेऊ शकतो.'

अ‍ॅशेस मालिकेनंतर इंग्लंड जानेवारी महिन्यात भारतात खेळण्यासाठी येणार आहे. अँडरसनला आशा आहे की तो तोपर्यंत खेळत असेल. तो म्हणाला, 'गोलंदाजाने वयाची तिशी पार केली की लोक त्यांना विचारतात की आता किती वेळ शिल्लक राहिला आहे. मात्र गेल्या तीन - चार वर्षात मी चांगली गोलंदाजी केली आहे. मी फिट आहे आणि चांगलं खेळत आहे.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Update : नेपाळच्या पुरात महाराष्ट्रातील पर्यटक अडकले, राज्य सरकारचे प्रयत्न सुरू, 4 जण सुरक्षित; मंत्री शंभूराज देसाईंनी दिली महत्त्वाची अपडेट

Central Railway: मध्य रेल्वेवर १५ दिवस पॉवरब्लॉक, अनेक लोकलवर परिणाम; वेळापत्रकात मोठे बदल

Sunetra Pawar: चिमुकलीवरील अत्याचार-हत्या प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार आक्रमक; आरोपीला फाशीची शिक्षा मिळवून देण्याची ग्वाही

Marathi News Live Updates : कोल्हापुरातील रस्त्यांची चाळण, ठाकरे गटाकडून खड्ड्यांमध्ये झाडं लावणार

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

SCROLL FOR NEXT