Khelo India Apeksha Sutar Shardha Lad Gold Medal Ratnagiri Marathi News
Khelo India Apeksha Sutar Shardha Lad Gold Medal Ratnagiri Marathi News 
क्रीडा

खेलो इंडियात अपेक्षा सुतार, श्रद्धा लाड यांचा सुवर्णवेध 

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - खेलो इंडिया राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा महोत्सवात महाराष्ट्राने अव्वल कामगिरी केली आहे. त्यात महाराष्ट्र खो-खो संघाचे नेतृत्व करणाऱ्या रत्नागिरीच्या कन्या अपेक्षा सुतार, श्रद्धा लाड यांनी उत्कृष्ट खेळ करत सुवर्णपदक पटकावले. 

आसाम गुवाहाटी येथे झालेल्या राष्ट्रीय खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्र खो-खो 21 वर्षांखालील संघामध्ये रत्नागिरीच्या राष्ट्रीय खेळाडू अपेक्षा आणि श्रद्धा यांची निवड झाली होती. या स्पर्धेत दोघींनीही उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. या स्पर्धेतील पहिला सामना ओडीसाबरोबर झाला. यामध्ये अपेक्षाने 2 मिनिटे 30 सेंकद खेळ करत 2 गडी तर श्रद्धाने 1 गडी बाद करत विजयात मोलाची कामगिरी बजावली. हा सामना महाराष्ट्र संघाने एक डाव राखून जिंकला. आसामबरोबरच्या सामन्यात अपेक्षाने 3 मिनिटे खेळ करत 1 गडी तर श्रद्धाने 2 मिनिटे नाबाद खेळ करत 3 गडी बाद केले होते. हा सामनाही महाराष्ट्राने सहज जिंकला. आंध्रप्रदेशबरोबरच्या सामन्यात अपेक्षाने 2 मिनिटे 40 सेंकद खेळ करताना 3 गडी बाद केले तर श्रद्धाने 1 गडी बाद केला. बलाढ्य केरळचे आव्हान महाराष्ट्राने यावर्षी सहज नमवले. महत्वाच्या सामन्यात अपेक्षाने चमकदार कामगिरी करत 3 मिनिटे 40 सेकंद खेळ करत 2 गडी टिपले होते.

खेलो इंडियाच्या अंतिम सामना महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक यांच्यात झाला. या सामन्यातही अपेक्षाने अष्टपैलू खेळाची चमक दाखवली. पहिल्या डावात 2 मिनिटे तर दुसऱ्या डावात 2 मिनिटे 50 सेकंदाचा खेळ करत 2 गडी बाद केले. या कामगिरीच्या जोरावर तिचा उत्कृष्ट संरक्षक म्हणून गौरव करण्यात आला. कर्नाटकवर सहज मात करत महाराष्ट्र संघाने सुवर्णपदक पटकावले. या विजयात रत्नागिरीच्या दोन्ही खेळाडूंची महत्वाची कामगिरी होती. 

या दोन्ही खेळाडूंना रत्नागिरीचे राष्ट्रीय प्रशिक्षक पंकज चवंडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांनी मिळवलेल्या यशाबद्‌दल महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव संदीप तावडे, क्रीडाशिक्षक विनोद मयेकर, आंतरराष्ट्रीय पंच समीर काबदुले यांच्यासह जिल्हा खो-खो असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime News: मानखुर्दमध्ये २७ वर्षीय तरुणीची हत्या; 'लव्ह जिहाद' म्हणत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न

Latest Marathi News Live Update : 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं; पंतप्रधान नरेंद्र मोदी माळशिरसमधून लाईव्ह

Gharoghari Matichya Chuli: ऐश्वर्याने केलं सौमित्रला किडनॅप; 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत नवा ट्विस्ट

Kalsubai Peak : आनंद महिंद्रांना देखील भावतोय महाराष्ट्राचा माऊंट एव्हरेस्ट, 'या' शिखराला कशी भेट द्यायची ?

T20 WC 24 Team India : भारतासाठी T20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूचा संघातून पत्ता कट?, जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT