KS Bharat Dedicates Century to Shri Ram News sakal
क्रीडा

Video : पठ्ठ्याने इंग्लिश गोलंदाजांना तुडव तुडव तुडवले! शतक ठोकत मैदानातून सोडला 'बाण', भरतचे जय श्रीराम

KS Bharat Dedicates Century to Shri Ram News :

Kiran Mahanavar

KS Bharat Dedicates Century to Shri Ram : टी-20 मालिकेत अफगाणिस्तानचा क्लीन स्वीप केल्यानंतर भारतीय संघ आता इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत खेळणार आहे. आता सध्या भारतीय अ संघ इंग्लंड लायन्सविरुद्ध सराव सामने खेळले जात आहे.

या सामन्यामध्ये टीम इंडियाचा यष्टीरक्षक केएस भरतने इंग्लंड लायन्सविरुद्ध धमाकेदार शतक झळकावले. या खेळीमुळे अडचणीत सापडलेल्या भारत अ संघाला सामना अनिर्णित ठेवण्यात यश आले. इंग्लंडविरुद्ध त्याने झळकावलेले शतक भारताने एका खास पद्धतीने साजरे केले आणि ते भगवान श्री रामाला समर्पित केले.

टीम इंडिया वर्षातील पहिल्या कसोटी मालिकेसाठी सज्ज आहे. मात्र, इंग्लंडविरुद्धचा सामना खेळण्यापूर्वी तिने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी खेळली आहे. नवीन वर्षातील ही भारताची पहिली कसोटी मालिका असणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला सामना गेल्या वर्षी झाला होता तर दुसरा सामना नववर्षाला झाला होता. 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय यष्टीरक्षक केएस भरतने इंग्लंड लायन्सविरुद्ध कठीण शतक झळकावले आणि सामना अनिर्णित राहिला.

इंग्लंड लायन्स विरुद्धच्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय यष्टीरक्षक केएल भरतने 116 धावांची खेळी केली. 490 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने दुसऱ्या डावात 5 गड्यांच्या मोबदल्यात 426 धावा केल्या, त्याआधी पंचांनी सामना अनिर्णित घोषित केला. भारताने तिसऱ्या दिवशी 4 गडी गमावून 159 धावा केल्या होत्या आणि पराभवाचा धोका होता. पण भरतने मानव सुथारच्या साथीने संघाला पराभवापासून वाचवले.

केएस भरतने 165 चेंडूंचा सामना करत 116 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत त्याने एकूण 15 चौकार मारले. भारतीय यष्टीरक्षक बॅटरने मानवसोबत 5व्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी केली. केएस भरतने शतक पूर्ण केल्यानंतर मैदानावर धनुष्यबाण सोडत सेलिब्रेशन साजरे केले. त्यांचे हे शतक श्रीरामाला समर्पित होते. 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT