सारा तेंडुलकर अन् शुभमनची बहीण दिसली एकत्र, कॅमेरा पाहून...

Sara Tendulkar And Shubman Gill Sister Shahneel Gill Late Night Outside Video Goes Viral marathi news
Sara Tendulkar And Shubman Gill Sister Shahneel Gill Late Night Outside Video Goes Viral marathi news sakal

महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर आणि भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिल यांच्यातील अफेअरच्या बातम्यांदरम्यान एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामुळे गिल आणि सारा यांच्यातील नात्याबद्दलच्या अटकळांना आणखीच खतपाणी घातले आहे.

खरं तर त्या व्हिडिओमध्ये काल रात्री शुभमन गिलची बहीण शहनील गिल सारा तेंडुलकरसोबत नाईट आऊट करताना दिसली होती. सारा आणि शाहनीलची ही भेट कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Sara Tendulkar And Shubman Gill Sister Shahneel Gill Late Night Outside Video Goes Viral marathi news
IND vs ENG Virat Kohli : तुमचा बॅझबॉल तर आमचा 'विराटबॉल'... गावसकरांनी इंग्रजांना कशाची घातली भीती?

व्हायरल व्हिडिओमध्ये, सारा तेंडुलकर काळ्या रंगाच्या कटआउट ड्रेसमध्ये दिसली तर शहनील देखील हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. रात्री उशिरा सारा आणि शहनील एका कारमध्ये स्पॉट झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. दोघीही कॅमेऱ्याच्या रडारखाली येताच थोड्या अस्वस्थ दिसल्या. सारा तेंडुलकर चेहरा लपवताना दिसली, तर शहनील मास्क घातलेली दिसली.

Sara Tendulkar And Shubman Gill Sister Shahneel Gill Late Night Outside Video Goes Viral marathi news
Sania Mirza Shoaib Malik : नव्या प्रवासासाठी... सानियाची शोएबच्या तिसऱ्या निकाहवर आली प्रतिक्रिया

सारा आणि शहनीलच्या या भेटीवरून अनेक अर्थ काढले जात आहेत. या भेटीनंतर सारा आणि शुभमनचे नाते फायनल होणार की काय? यावेळी त्यांनी कॅमेऱ्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी दोघीही पहिल्यांदाच एकत्र दिसल्या. शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर यांच्या अफेअरच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत, मात्र दोघांनीही या नात्याचा अधिकृत खुलासा केलेला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com