Sania Mirza Shoaib Malik : नव्या प्रवासासाठी... सानियाची शोएबच्या तिसऱ्या निकाहवर आली प्रतिक्रिया

Sania Mirza Shoaib Malik
Sania Mirza Shoaib Malik esakal

Sania Mirza Divorce : शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत निकाह केल्यानंतर सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा काडीमोड झाला आहे यावर शिक्कामोर्तब झालं. शोएबने तिसऱ्या निकाहचे फोटो शेअर केल्यावर सानियाची यावर काय प्रतिक्रिया आहे याची सर्वांना उत्सुकता होती. अखेर कुटुंबियांमार्फत सानिया मिर्झाची प्रतिक्रिया आली आहे.

सानिया मिर्झाची बहीण अनम मिर्झाने इन्स्टाग्रावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सानियाने शोएबला त्याच्या पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्याचं म्हटलं आहे.

Sania Mirza Shoaib Malik
IND vs ENG Virat Kohli : विराटचा इगो... इंग्लंडचा संघ भारताच्या वर्मावर बोट ठेवणार?

अनम मिर्झाने मिर्झा कुटुंबीय आणि टीम सानियातर्फे एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये लिहिलं आहे. 'सानियाने तिचे वैयक्तिक आयुष्याची सार्वजनिकरित्या चर्चा केली नाही. मात्र आता तिने आणि शोएबने काही महिन्यापूर्वीच घटस्फोट घेतला असल्याचे सांगण्याची गरज निर्माण झाली आहे. सानियाने शोएबला त्याच्या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.'

'आयुष्याच्या या नाजूक वळणावर आम्ही सर्व चाहत्यांना आणि हितचिंतकांना विनंती आहे की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि सानियाच्या प्रायव्हसीचा आदर करा.'

Sania Mirza Shoaib Malik
Sana Javed Controversy : शोएबला आवडली पण 'पाक इंडस्ट्री' ला झाली नकोशी! काय आहे 'सना' ची स्टोरी?

गेल्या काही दिवसांपासून सानिया मिर्झा आणि तिचा पती शोएब मलिक यांचा तलाक झाल्याच्या अनेक अफवा पसरल्या होत्या. आता शोएब मलिकने आपल्या तिसऱ्या निकाहचे फोटो शेअर करत विषय संपवला. यानंतर लगेचच सानिया मिर्झाच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

सानियाचे वडील इम्रान मिर्झा यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, सानियाने तलाक नाही तर खुला पद्धतीने शोएबला घटस्फोट दिला. मुस्लिम महिलांच्या अधिकारांनुसार खुला म्हणजे मुस्लिम महिला तिच्या पतीला स्वतःच घटस्फोट देते.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com