Marsh Cup Australia Hilton Cartwright Massive Catch Video ESAKAL
क्रीडा

VIDEO: हिल्टनचा हा भन्नाट कॅच पाहताना श्वास नक्कीच अडकेल

सकाळ डिजिटल टीम

ऑस्ट्रेलियाचा संघ तब्बल 24 वर्षांनी पाकिस्तानचा दौरा करत आहे. सुरूवातीला होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी कांगारूंचा कसोटी संघ पाकिस्तानात दाखल झाला आहे. मालिकेतील पहिली कसोटी देखील पार पडली आहे. एकीकडे ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय संघ पाकिस्तन दौऱ्यावर असताना मायदेशात मार्श कप (Marsh Cup) ही स्थानिक क्रिकेट स्पर्धा पार पडली. या स्पर्धेतील अंतिम सामना शुक्रवारी वेस्टर्न ऑस्ट्रेलिया (Western Australia) आणि न्यू साऊथ वेल्स यांच्यात रंगला. शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठावर्धक झालेल्या या सामन्यात वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने न्यू साऊथ वेल्सचा 18 धावांनी पराभव केला. या सामन्यातील हिल्टन कार्टराईटने (Hilton Cartwright) बाऊंडी लाईनवर घेतलाला एक जबरदस्त कॅच (Massive Catch Video) सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातल आहे.

सामन्याच्या 44 व्या षटकात हिल्टन कार्टराईटने बाऊंडी लाईनवर घेतलेला कॅच पाहून अनेकांना असा कॅच घेणं शक्य आहे का आसा प्रश्न पडला असेल. हिल्टनच्या या कॅचनं (Hilton Massive Catch) सामन्याचे चित्रच पालटले. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या 226 धावांचा पाठलाग करताना न्यू साऊथ वेल्स मजबूत स्थितीत होती. याचदरम्यान वेस्टर्न संघाने दोन झटपट विकेट घेत सामन्याचे चित्र पालटले. वेल्सचा मोझेस हेन्रिक्स आणि बेन द्वारशुईस दोघेही चांगली फलंदाजी करत होते. वेल्सला विजयासाठी 36 चेंडूत 22 धावांची गरज होती. मात्र हिल्डनने एक अविश्वसनीय कॅच पकडत सामन्याचे पारडे वेस्टन ऑस्ट्रेलियाकडे झुकवले.

हेन्रिक्सने 44 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर डी आर्सी शॉर्टला एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, लाँग ऑनला फिल्डिंग करणाऱ्या कार्टराईटने बाऊंडरीकडे जात असलेला हा चेंडू हवेत डाईव्ह मारत पकडला. यावेळी हिल्टन कार्टराईटचे संपूर्ण शरीर हवेत होते. तो हातावरच लँड झाला. तरीदेखील त्याने हातातील चेंडू सुटू दिला नाही. हा कॅच बघताना लोकांचा श्वास अडकला असणार हे नक्की

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT