क्रीडा

गुरुचे 100 मीटरचे रेकॉर्ड, तरी ऑलिम्पिक पदक नव्हतं; नीरजने केली कमाल

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचा भालाफेकपटून नीरज चोप्राने सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचला. त्यानं 87.58 मीटर भाला फेक करत अॅथलेटिक्समध्ये देशाला सुवर्ण पदक मिळवून दिलं. नीरजच्या या यशात त्याचे प्रशिक्षक उवे हॉन यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. उवे हॉन हे जर्मनीचे स्टार खेळाडू होते. सध्या 59 वर्षांचे असलेले हॉन हे एकमेव असे भालाफेकपटू आहेत ज्यांनी 100 मीटर अंतर पार केलं आहे. त्यांनी 1984 मध्ये 104.8 मीटर भालाफेक करत विश्वविक्रम नावावर केला होता.

उवे हॉन यांनी जुन्या भाल्याने हा विक्रम केला होता. त्यानंतर 1986 मध्ये नव्या डिझाइनच्या भाल्याने भालाफेक सुरु झाली. नव्या डिझाइनच्या भाला आल्यानंतर जॅन जेलेगनीच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड आहे. त्यानं जर्मनीतील जेस्स मीटिंग इव्हेंटमध्ये 98.48 मीटर अंतरावर भाला फेकला होता. 1996 मध्ये त्याने ही कामगिरी केली होती.

नीरज प्रमाणेच हॉन यांनी वयाच्या 19 वर्षीच या भालाफेकीत नावलौकिक मिळवण्यास सुरुवात केली. त्यांनी 1981 मध्ये युरोपियन ज्युनिअर चॅम्पियनशिपमध्ये 86.58 मीटर भाला फेकला होता. त्यानतंर 1982 मध्ये युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये 91.34 मीटर अंतर नोंदवलं होतं.

1984 ला झालेल्या लॉस एंजिलिसमधील ऑलिम्पिकमध्ये त्यांना भाग घेता आला होता. त्यावेळी जर्मनीने अमेरिकेच्या विरोधात या खेळांवर बहिष्कार टाकला होता. मात्र, त्यानंतर बर्लिनमध्ये झालेल्या अॅथलेटिक्स मीटमध्ये हॉन यांनी 104.8 मीटर भालाफेक करत वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला होता. एका मुलाखतीत म्हणाले होते की, 'माझी कोणतीही चूक नसताना ऑलिम्पिक पदक मिळालं नव्हतं. मी सुवर्ण जिंकू शकलो असतो' ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवता आलं नसलं तरी त्यांनी 1985 मध्ये आयएएएफ वर्ल्ड कपमध्ये 96.96 मीटर भाला फेक करत सुवर्ण पदक पटकावलं होतं.

हॉन यांच्या मार्गदर्शनाखाली नीरजने यशाचे शिखर गाठले आहे. हॉन प्रशिक्षक असताना नीरजने 2018 च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये 86.47 मीटर भालाफेक करत गोल्ड मेडल पटकावलं होतं. त्यानंतर डायमंड लीग 2018 मध्ये 87.43 मीटर भाला फेक करताना नीरजने स्वत:ची वैयक्तिक सर्वोच्च कामगिरी नोंदवली होती. आशियाई क्रीडा स्पर्धेत 88.06 मीटर अंतर भाला फेक करत तो विजयी झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Wayanad: राहुल गांधींचे ठरले! अखेर वायनाडचा 'हात' सोडला

युएसएला मिळालं बक्षीस! मात्र सुपर 8 मधून बाहेर पडूनही पाकिस्तान 'या' कारणामुळं T20 World Cup 2026 साठी थेट पात्र

Samata Parishad : छगन भुजबळ वेगळी भूमिका घेणार? समता परिषदेच्या बैठकीत कार्यकर्त्यांची मागणी?

T20 World Cup: अमेरिकेकडून खेळणाऱ्या हरमीतने रोहितच्या कोचला दिलं श्रेय! म्हणाला, 'त्यांनीच माझ्यात...'

Mumbai Local : गुड न्यूज! मुंबई लोकल धावणार 'टाईम टू टाईम', रेल्वेकडून 'हे' मोठे बदल

SCROLL FOR NEXT