P V Sindhu reaches Semi Final of Thailand Open
P V Sindhu reaches Semi Final of Thailand Open  
क्रीडा

थायलंड बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूची उपांत्य फेरीत धडक

वृत्तसंस्था

बॅंकॉक (थायलंड) : भारताच्या पी. व्ही. सिंधू हिने अपेक्षित कामगिरी करताना थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. सिंधूने शुक्रवारी मलेशियाच्या सोनिया छेह हिचा 21-17, 21-13 असा पराभव केला.

द्वितीय मानांकित सिंधूने सातत्यपूर्ण कामगिरी करताना छेह हिच्यावर 36 मिनिटांत विजय मिळविला. उपांत्य फेरीत तिची गाठ आता इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मरिस्का हिच्याशी पडणार आहे.
सिंधूचा विजय सहज दिसत असला, तरी या लढतीत दोन्ही खेळाडू आपल्या स्ट्रोक्‍सचा टप्पा खोलवर राखण्यात अपयशी ठरत होत्या. विशेष करून सिंधू यामुळे अनेकदा अडचणीत आल्याची दिसत होती. त्यामुळेच एक वेळ सोनिया 7-11 अशी आघाडीवर होती. गेमच्या उत्तरार्धात सिंधूने संयमाने खेळ करून लढतीवर नियंत्रण मिळविले. सलग पाच गुण मिळवत तिने 13-12 अशी आघाडी मिळवली. सोनिया लांबवर स्ट्रोक्‍स खेळत होती, तेव्हा सिंधूने सलग चार गुणांची कमाई करत आपल्या आक्रमकतेने तिच्यावर दडपण आणले. खोलवर स्मॅशने गुण मिळवत सिंधूने पहिला गेम जिंकला.

दुसऱ्या गेमला सिंधूने 6-3 अशी आघाडी घेतली. या वेळी सोनियाने जोरदार प्रत्युत्तर देत 8-8 अशी बरोबरी साधली. त्यानंतर दोघींकडून सातत्याने चुका झाल्या. यात सिंधूने अनुभव पणाला लावत 11-9 अशी आघाडी कामय राखली. अखेरच्या टप्प्यातही सोनियाने जोरादर प्रतिकार करताना तीन मॅच पॉइंट वाचविले. अशा वेळी सिंधूने पुन्हा एकदा खोलवर स्मॅशने विजयावर शिक्कामोर्तब केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT