Power Lifting
Power Lifting sakal
क्रीडा

वडील मंदिरात पुजारी, मुलाची खेळावर भक्ती; राष्ट्रीय स्पर्धेत ‘सुवर्ण’प्राप्ती

नरेंद्र चोरे

छोट्या गावातील सामान्य कुटुंबातील एखाद्या खेळाडूने स्वप्न पाहिले आणि त्या दिशेने कसून मेहनत केली तर, या जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही, हेच जणू श्रवणने सिद्ध केले.

नागपूर - वडील मोनिराज चतुर्वेदी तब्बल चाळीस वर्षांपासून कोराडी येथील महालक्ष्मी मंदिरात पुजारी. मुलगा श्रवणची मात्र, खेळावर भक्ती जडली. महादुलासारख्या छोट्या ठिकाणी राहात असतानाही ‘असाध्य ते साध्य करीता सायास, कारण अभ्यास’ या संत तुकारामांच्या ओळींप्रमाणे अपार कष्ट केले. एकच ध्यास घेतला आणि राष्ट्रीय स्पर्धेत आपल्या नावाचा डंका दुमदुवला.

छोट्या गावातील सामान्य कुटुंबातील एखाद्या खेळाडूने स्वप्न पाहिले आणि त्या दिशेने कसून मेहनत केली तर, या जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही, हेच जणू श्रवणने सिद्ध केले. नुकत्याच बंगळूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील `प्रो लीग इंडिया पाॅवरलिफ्टिंग` स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून आपली ताकद दाखवून दिली.

आंततरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र

२४ वर्षीय श्रवणने ११० किलो वजनगटातील `बेंच प्रेस` प्रकारात सर्वाधिक १८२.५ किलो वजन उचलून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. या स्पर्धेत विविध वजनगटांमध्ये देशभरातील १७० पाॅवरलिफ्टर्स सहभागी झाले होते. या शानदार कामगिरीच्या आधारावर श्रवण आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. पुढील वर्षी याच ठिकाणी आशियाई स्पर्धा होणार असून, त्यात आपल्याला संधी मिळणार असल्याचे श्रवणने सांगितले.

चार सुवर्णपदकांची कमाई

श्रवणने आतापर्यंत भारतीय `पाॅवरलिफ्टिंग महासंघा`तर्फे आयोजित राष्ट्रीय स्पर्धांमध्ये चार सुवर्णपदकांची कमाई केली. इतरही अनेक स्पर्धा गाजविल्या. पांजरा येथील `फ्रेंड्स फिट फॅक्टरी` येथे प्रशिक्षक पंकज फेंद यांच्या मार्गदर्शनात प्रॅक्टिस करणारा श्रवण जिममध्ये कसरत करीत असताना अचानक त्याला मित्रांकडून या स्पर्धेविषयी माहिती मिळाली. त्यामुळे नशीब आजमावण्यासाठी तो स्पर्धांमध्ये सहभागी होऊ लागला. अल्पावधीतच त्याने स्वतःला सिद्ध केले. आई-वडिलांचे प्रोत्साहन आणि प्रशिक्षक व मित्रांनी केलेल्या सपोर्टमुळे तो थेट राष्ट्रीय स्तरावर पोहोचला. मुलाने खेळात सोनेरी यश मिळवून कोराडीला राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवून दिल्याबद्दल श्रवणचे आईवडीलही खुश आहेत.

आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदकाचे स्वप्न

श्रवण अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षात आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक जिंकण्याची इच्छा असून त्यासाठी तो गुरूच्या मार्गदर्शनात मेहनत घेत आहे. नोकरीच्या मोहात न पडता `जिम ट्रेनर` बनून युवा पिढी घडविण्याचा त्याचा मानस आहे.

राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके जिंकली. तरी अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशासाठी पदक जिंकण्याचे स्वप्न आहे. त्यानंतरच मला या खेळात खरी ओळख मिळेल. प्रायोजक मिळविणे हे ही एक टास्क आहे.

- श्रवण चतुर्वेदी, राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता पॉवरलिफ्टर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT