Smriti Mandhana Asia Cup 2023 esakal
क्रीडा

Smriti Mandhana : स्मृतीसाठी केला 1200 किलोमीटरचा प्रवास; चीनचा जबरा फॅन म्हणाला ती तर 'देवी'

Mandhana the Goddess: चीनचा जबरा फॅन

अनिरुद्ध संकपाळ

Smriti Mandhana Asia Cup 2023 :

भारतीय महिला क्रिकेट संघाने चीनमधील हांगझू येथे होत असलेल्या एशियन गेम्समध्ये सुवर्ण पदक जिंकले. श्रीलंकेविरूद्धच्या अंतिम सामन्यात भारताची उपकर्णधार स्मिती मानधनाने 45 चेंडूत 46 धावांची खेळी करत भारताच्या विजयात मोठा वाटा उचलला.

जरी भारतीय संघ चीनमध्ये खेळत असला तरी स्मृती मानधनाचे जबरदस्त फॅन फॉलोईंग चीनमध्येही दिसले. विशेष म्हणजे हांगझूमध्ये 'मानधना द गॉडेस' चे बॅनर झळकले. हे बॅनर झळकवणारा कोणी भारतीय नसून एक चीनचा युवक आहे.'

'चीनचा हा जून यू युवक क्रिकेटचा चाहता आहे. या क्रिकेटच्या आणि आपल्या देवीचे म्हणजेच स्मृती मानधनाचे दर्शन घेण्यासाठी त्याने बिजिंगपासून हांगझू हा तब्बल 1200 किमीचा प्रवास केला.

जून यू पीटीआयशी बोलताना म्हणाला की, '2019 च्या वर्ल्डकपमध्ये मी ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराहचा स्पेल पाहिला होता. मी रोहित शर्मा आणि विराट कोहलीला देखील फॉलो करतो. ते क्रिकेटमधील सध्याचे दिग्गज खेळाडू आहेत. त्यानंतर आता सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांचा नंबर लागतो. 2019 च्या ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराहने चांगली गोलंदाजी केली होती.'

यूला क्रिकेटबद्दल कशी माहिती मिळाली याबाबत बोलताना तो म्हणतो की, 'चीनमध्ये फारसं क्रिकेट होत नाही. फार कमी क्रिकेट मैदाने आहेत आणि फार कमी लोकं क्रिकेट खेळतात. अनेक लोकांना तर क्रिकेट कसं खेळतात हे देखील माहिती नसतं.'

'फक्त गुआंगझू येथे क्रिकेट 2010 च्या एशियन गेम्सवेळी क्रिकेट खेळलं गेलं. तेथेच क्रिकेटंच स्टेडियम आहे. तेही ऐतिहासिक कारणामुळे.'

यू पुढे म्हणाला की, 'माझी इच्छा असली तरी मी क्रिकेट खेळू शकत नाही. इथे त्या योग्यतेचे क्रिकेट ग्राऊंडही नाहीत. एशियन गेम्सपूर्वी इथं फुलांचे मैदान होते. एशियन गेम्ससाठी हे फुलांच मैदान क्रिकेट स्टेडियममध्ये रूपांतरित करण्यात आले. एशियन गेम्सपूर्वी काही सराव सामने इथे झाले होते.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Rate Today: सोनं-चांदीच्या भावात मोठी घसरण! 11 सप्टेंबरला पुन्हा दर कोसळणार? जाणून घ्या ताजी अपडेट

‘त्याला माझी इनसिक्युरिटी वाटायची’; अनेक वर्षांनंतर नीना गुप्तांनी उघड केलं गुपित, म्हणाल्या...'माझ्यापेक्षा जास्त...'

ChatGPT's 80s Photo Trend: Instagram वर व्हायरल होतोय 'ChatGPT ’80s Photo Trend'; 'हा' सोपा प्रॉम्प्ट वापरून तयार करा तुमचा ८० च्या दशकातील रेट्रो लूक!

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

Share Market Today: इराणच्या अमेरिकेला धमकीने शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 500 अंकांनी खाली; कोणत्या शेअर्सला मोठा फटका?

SCROLL FOR NEXT