Sourav Ganguly esakal
क्रीडा

सौरभ गांगुलीचे आता घरातच होणार 'विलगीकरण'

अनिरुद्ध संकपाळ

कोलकाता : बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली (Sourav Ganguly) यांना कोरोनाची (Corona) लागण झाल्यानंतर त्यांना कोलकाता येथील वूडलँड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते व्याधीग्रस्त श्रेणी मोडत असल्याने त्यांच्या प्रकृतीची चाहत्यांना चिंता होती. या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सौरभ गांगुलीला आज रुग्णलयातून सुट्टी (Discharged) देण्यात आली आहे. पण, ते कोरोनाग्रस्त असल्याने त्यांना पुढचे दोन आठवडे गृह विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे.

रुग्णालय प्रशासनाने पीटीआयला सांगितले की, 'आम्ही आज गागुंलीला रुग्णालयातून सुट्टी दिली आहे. त्यांना पुढचे दोन आठवडे घरातच डॉक्टरांच्या निगराणीखाली विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर पुढे त्यांच्यावर कशा प्रकाराचे उपचार सुरु करायचे हे ठरवण्यात येईल.'

सौरभ गांगुली कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive Sourav Ganguly) झाल्यानंतर त्याला सोमवारी रात्री वूडलँड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सौरभ गांगुलाला खबरदारीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती स्थीर होती. गांगुलीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याच्यावर मोनोक्लॉनल अँटीबॉडी कॉक्टेल उपचार करण्यात आले होते.

सौरभ गांगुली या वर्षात दोन वेळा रुग्णालयात दाखल झाला होता. त्यांच्यावर दोनदा अँजियोप्लास्टी करण्यात आली होती. याचबरोबर सौरभ गांगुलीचा मोठा भाऊ स्नेहशील गांगुली देखील या वर्षाच्या सुरुवातीला कोरोना पॉझिटिव्ह झाला होता. (Corona Positive Sourav Ganguly Health Update)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Navy Rescue: तेल प्रश्न सुटणार? मध्यपूर्वेच्या युद्धछायेत भारताची मोठी तयारी; टँकर वाचवण्यासाठी युद्धनौका सज्ज, हालचाली वाढल्या

Israel Iran War : मोठा दिलासा ! जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती उतरल्या, डोनाल्ड ट्रम्प यांचे युद्ध संपविण्याचे संकेत

Jayant Patil: राज्य कर्जाच्या विळख्यात: आमदार जयंत पाटील यांचा सरकारवर घणाघात, घोषणांचा पाऊस आणि तरतुदींचा दुष्काळ!

Relief From Dangerous Potholes in Beed : सात वर्षांच्या संघर्षानंतर धानोरा रस्त्याला नवा श्वास; दोन टप्पे पूर्ण!

Satara Bribery Case: प्राध्‍यापक पदोन्नतीसाठी खटावमध्ये लाचखोरी; लाखोंच्‍या राेकडसह दाेन लोकसेवक ताब्यात, सातारा जिल्ह्यात उडाली खळबळ!

SCROLL FOR NEXT