2022 ठरणार क्रीडा रसिकांसाठी मेजवाणी

2022 Sports Schedule
2022 Sports Scheduleesakal

क्रीडा विश्वाने अनेक मोठ्या स्पर्धांचे यशस्वी आयोजन करुन कोरोना काळात 'न्यू नॉर्मल'चा एक आदर्शच घालून दिला. फुटबॉलच्या मैदानापासून सुरु झालेला न्यू नॉर्मल प्रवास आता नॉर्मल होत आहे. 2021मध्ये क्रीडा रसिकांसाठी अनेक मोठ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यात कोरोनामुळे पुढे ढकलाव्या लागलेल्या अनेक स्पर्धांचा समावेश होता. गेल्या वर्षी टोकियो ऑलिम्पिक, युरो कप, कोपा अमेरिका, टेनिसमधील ग्रँड स्लॅम स्पर्धा, टी20 वर्ल्डकप, आयपीएलचे दोन हंगाम यांचे यशस्वी आयोजित झाले. आता 2021 काही तासातच संपेल त्यामुळे सर्वांनाच आता 2022 चे (Happy New Year 2022) वेध लागले आहेत. 2022 (Year 2022) या वर्षात क्रीडा विश्वासाठी परवणीच ठरणार आहे. कारण 2022 मध्ये मोठ्या स्पर्धांचा भरगच्च कार्यक्रम क्रीडा रसिकांची वाट पाहत आहे. (2022 Sports Schedule)

2022 Sports Schedule
Lookback 2021: क्रिकेट जगताला हादरवणाऱ्या 8 घटना

17 ते 30 जानेवारी 2022 : ऑस्ट्रेलिया ओपन (Australian Open 2022 Schedule)

2022 वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजे जानेवारीमध्ये 17 ते 30 दरम्यान ऑस्ट्रेलियन ओपन ही ग्रँडस्लॅम स्पर्धा होणार आहे. मात्र या स्पर्धेत रॉजर फेडरर, राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोविच हे आघाडीचे टेनिसपटू सहभागी होणार नाहीत. त्यामुळे यंदा ऑस्ट्रेलिया ओपनला नवा विजेता मिळण्याची शक्यता आहे.

4 ते 20 फ्रेब्रुवारी 2022 : विंटर ऑलिम्पिक (Winter Olympics 2022 Schedule)

यंदाचे विंटर ऑलिम्पिक हे 4 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी दरम्यान चीनमध्ये होणार आहे. मात्र ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. अनेक देशांनी चीनमध्ये मानवी हक्कांची पायमल्ली होत असल्याचे सांगत राजनैतिक बहिष्कार घातला आहे. अनेक देशांच्या सरकारचे प्रतिनिधी विंटर ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार नाहीत. मात्र त्यांचे खेळाडू सहभागी होतील.

4 मार्च ते 3 एप्रिल 2022 : आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकप (ICC Women’s Cricket World Cup 2022 Schedule)

क्रिकेट जगतातील मोठी स्पर्धा 2022 च्या मार्च महिन्यात सुरु होणार आहे. आयसीसी महिला वर्ल्डकपची सुरुवात मार्च महिन्याच्या ४ तारखेला होईल. ही स्पर्धा ३ एप्रिल पर्यंत चालेल. या स्पर्धेचे आयोजन न्यूझीलंडमध्ये होणार आहे.

2022 Sports Schedule
Lookback 2021: कोहलीसाठी वर्ष ठरलं 'पणौती'

22 मे ते 5 जून 2022 : फ्रेंच ओपन (French Open 2022 Schedule)

ऑस्ट्रेलिया ऑपनमध्ये जरी स्टार टेनिसपटू न खेळण्याने निराशा होणार असली तरी मे महिन्यात पुन्हा एकदा क्ले कोर्टवर हे दिग्गज भिडण्याची शक्यता आहे. फ्रेंच ओपन मे महिन्याच्या 22 तारखेपासून जूनच्या 5 तारखेपर्यंत खेळवली जाणार आहे.

27 जून ते 10 जुलै 2022 : विंम्बल्डन (The Wimbledon 2022 Schedule)

इतिहासात पहिल्यांदाच विंबल्डन ही ग्रँडस्लॅम स्पर्धा उन्हाळ्याच्या मध्यावर सुरु होणार नाही. त्यामुळे इतर ग्रँडस्लॅम झाल्यानंतर लगेचच विंबल्डन देखील होणार आहे.

28 जुलै ते 8 ऑगस्ट 2022 : राष्ट्रकुल स्पर्धा (Commonwealth Games 2022 Schedule)

2022 मध्ये जुलै महिन्यात राष्ट्रकुल स्पर्धेचा महामेळावा इंग्लंडच्या बर्मिंहॅममध्ये भरणार आहे. यात १९ खेळांची २८६ सत्र होणार आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलांचे पदाकाचे इव्हेंट पुरुषांपेक्षा जास्त होणार आहेत.

29 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर 2022 : युएस ओपन ( US Open 2022 Schedule)

यंदा टेनिसमधील चार ग्रँडस्लॅम स्पर्धा या पाठोपाठ होणार आहे. चार ग्रँडस्लॅम स्पर्धेतील शेवटची स्पर्धा म्हणजे युएस ओपन ही 29 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे. गेल्या युएस ओपनमध्ये रशियाच्या डॅनील मॅद्वदेवने स्टार नोव्हाक जोकविचला पराभवाचा धक्का दिला होता.

10 ते 25 सप्टेंबर : एशियन गेम्स (Asian Games 2022 Schedule)

एशियाड या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एशियन गेम्सची सुरुवात 10 सप्टेंबरला चीनमधील हांगझोऊमध्ये होणार आहेत. या स्पर्धेत ४० खेळ आणि ४८२ खेळाचे प्रकार आयोजित करण्यात येतील.

16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर 2022 : आयसीसी टी 20 वर्ल्डकप (ICC Men’s cricket T20 World Cup 2022)

आयसीसीचा 8 वा टी 20 वर्ल्डकप हा 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर 2022 दरम्यान ऑस्ट्रेलियात खेळला जाणार आहे. ही स्पर्धा सुरुवातीला नोव्हेंबर 2021 मध्ये खेळवला जाणार होता. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आयसीसीने हा वर्ल्डकप 2022 मध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारत 2021 चा वर्ल्डकप आयोजित करेल तर ऑस्ट्रेलिया 2022 मध्ये होणारा टी 20 वर्ल्डकप आयोजित करण्याचे ठरले.

2022 Sports Schedule
Lookback 2021 : कसोटीत आर अश्विन किंग; पाहा टॉप 5 गोलंदाज

12 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर 2022 : फिफा वर्ल्डकप (FIFA World Cup 2022 Schedule)

2022 मधील सर्वात मोठी स्पर्धा फिफा वर्ल्डकप कतारमध्ये आयोजित केली जाणार आहे. पहिल्यांदाच फिफा वर्ल्डकप हा मध्य - पूर्व आशिया आणि अरब जगतात आयोजित केला जाणार आहे. 2021 मध्ये उद्घाटन झालेल्या बयात स्टेडियममध्ये स्पर्धेचा पहिला सामना होणार आहे.

टी 20 आशिया कप (Asia Cup 2022 Schedule)

15 वी आशिया कप क्रिकेट स्पर्धा (टी 20) 2022 मध्ये होणार आहे. ही स्पर्धा टी २० स्पर्धा म्हणून खेळवण्यात येणार आहे. टी 20 वर्ल्डकप पूर्वी ही स्पर्धा होणार असल्याने हा निर्णय घेतला आहे. तोंडावर हा या स्पर्धेचे आयोजन श्रीलंकेत होणार आहे. भारताने 2018 मध्ये बांगलादेशचा पराभव करत आशिया कप जिंकला होता. त्यामुळे 2022 च्या आशिया कपमध्ये भारत गतविजेता असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com