School State Basketball Tournament Top Breaking News in marathi
School State Basketball Tournament Top Breaking News in marathi 
क्रीडा

राज्य शालेय बास्केटबाॅल स्पर्धेचे ' असे ' हाेणार सामने

सिद्धार्थ लाटकर

सातारा : जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयूट ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने रयत शिक्षण संस्थेच्या शतक महोत्सवानिमित्त येथे आजपासून (सोमवार) 65 व्या राज्यस्तरीय आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा गुरुवार पेठेतील श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकूल येथे सायंकाळी चार वाजल्यापासून सुरु हाेईल.

ही स्पर्धा 19 वर्षाखालील मुलांच्या आणि मुलींच्या गटाची आहे. स्पर्धेसाठी राज्यातील आठ विभागातून 288 खेळाडू, संघव्यवस्थापक, पंच तसेच निवड समिती सदस्य आले आहेत. या स्पर्धेत राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग आहे. प्रेक्षकांना स्पर्धेचा आनंद लुटता यावा यासाठी यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयूट ऑफ सायन्स कॉलेजच्या माध्यमातून विशेष प्रेक्षक गॅलरी उभारली आहे.

या स्पर्धेसाठी मुलांच्या गटातून यजमान कोल्हापूर विभागातून यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा, लातूर विभागातून यशवंत ज्युनिअर कॉलेज, बाबानगर, नांदेड, अमरावती विभागातून श्रीरामकृष्ण क्रीडा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, अमरावती, नाशिक विभागातून मालेगाव हायस्कूल ऍन्ड ज्युनिअर कॉलेज मालेगाव, औरंगाबाद विभागातून देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद, नागपूर विभागातून सेंटर पॉईंट स्कूल, काटोल रोड, नागपूर, पुणे विभागातून डॉ. शामराव कलमाडी हायस्कूल ऍन्ड ज्युनिअर कॉलेज, पुणे तसेच मुंबई विभागातून फादर आग्नेल स्कूल, वाशी हे संघ दाखल झाले आहेत.
 

मुलींच्या गटातून यजमान कोल्हापूर विभागातून वारणा महाविद्यालय, वारणा, लातूर विभागातून महात्मा गांधी महाविद्यालय, अहमदपूर, नाशिक विभागातून बारनेत स्कूल ऍन्ड ज्युनिअर कॉलेज, नाशिक, औरंगाबाद विभागातून देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद, पुणे विभागातून फर्ग्यसुन कॉलेज, पुणे, मुंबई विभागातून आर. ए. पोदार कॉलेज, माटूंगा, अमरावती विभागातून श्रीरामकृष्ण क्रीडा विद्यालय, नागपूर विभागातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, नागपूर हे संघ दाखल झाले आहेत.

या स्पर्धेचे उदघाटन सायंकाळी साडे पाच वाजता जिल्हाधिकारी श्वेता सिंघल व मान्यवरांच्या उपस्थित हाेईल. 

मुलांच्या सामन्यांचे नियोजन  
सोमवार (ता. 4) दुपारी चार वाजता अमरावती विरुद्ध पुणे विभाग

उदघाटन समारंभानंतर कोल्हापूर विरुद्ध लातूर

औरंगाबाद विरुद्ध नागपूर

नाशिक विरुद्ध मुंबई

मंगळवारी (ता. पाच) सकाळच्या सत्रात पहिला उपांत्य फेरी सामाना औरंगाबाद विरुद्ध नागपूर यांच्यातील विजेता संघ विरुद्ध अमरावती विरुद्ध पुणे यांच्यातील विजेता संघ.

दूसरा उपांत्य फेरी सामाना कोल्हापूर विरुद्ध लातूर यांच्यातील विजेता संघ विरुद्ध नाशिक विरुद्ध मुंबई यांच्यातील विजेता संघ.

मुलींच्या सामन्यांचे नियोजन
सोमवार (ता. 4) दुपारी चार वाजता अमरावती विरुद्ध कोल्हापूर.
उदघाटन समारंभानंतर औरंगाबाद विरुद्ध पुणे. 
नागपूर विरुद्ध नाशिक. 
लातूर विरुद्ध मुंबई.

मंगळवारी (ता. पाच) सकाळच्या सत्रात पहिला उपांत्य फेरी सामाना अमरावती विरुद्ध कोल्हापूर यांच्यातील विजेता संघ विरुद्ध नागपूर विरुद्ध नाशिक यांच्यातील विजेता संघ. दूसरा उपांत्य फेरी सामाना औरंगाबाद विरुद्ध पुणे यांच्यातील विजेता संघ विरुद्ध लातूर विरुद्ध मुंबई यांच्यातील विजेता संघ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदेंचा दणका; अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचा 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश!

Share Market Today: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत; आज कोणते 10 शेअर्स असतील ॲक्शनमध्ये?

Irrfan Khan: जेव्हा राजेश खन्ना यांच्या घरी AC दुरुस्त करायला गेला होता इरफान खान; हा किस्सा माहितीये का?

Besan Pohe Cutlet : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा चवदार बेसन पोहे कटलेट, वाचा सोपी रेसिपी

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

SCROLL FOR NEXT