wi vs ind 2st t20
wi vs ind 2st t20  
क्रीडा

WI vs IND: सलग दोन पराभवानंतर टीम इंडियात होणार मोठे बदल! 'या' खेळाडूंना Playing 11 मधुन डच्चू?

Kiran Mahanavar

WI vs IND 3rd T20 Team India Playing 11 : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील तिसरा सामना आज खेळवला जाईल. वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी आणि एकदिवसीय मालिका जिंकणारी टीम इंडिया आपल्या चुकांमुळे टी-20 मालिकेत 0-2 ने पिछाडीवर आहे.

भारताला जर ही मालिका जिंकायची असेल, तर तिला तिसरा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना कोणत्याही किंमतीत जिंकावा लागेल. सलग दोन पराभवांनंतर तिसऱ्या टी-20 सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल होऊ शकतात.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल सलामीला येतील. अशा स्थितीत यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन पाचव्या क्रमांकावर जाईल. यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल हे दोन्ही फलंदाज पॉवर-प्लेमध्ये धावा लुटण्यात माहिर आहेत.

उपकर्णधार सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरणार आहे. भारतीय संघ व्यवस्थापन तिलक वर्माला प्लेइंग इलेव्हनमध्ये चौथ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून संधी देईल. यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनला पाचव्या क्रमांकावर संधी मिळेल.

संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले जाऊ शकते. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या आणि दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात संजू सॅमसन केवळ 12 आणि 7 धावांवर बाद झाला. संजू सॅमसनने त्याच्या शेवटच्या 5 टी-20 आंतरराष्ट्रीय डावात 30, 15, 5, 12 आणि 7 धावा केल्या आहेत.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्या सहाव्या क्रमांकावर अष्टपैलू म्हणून फलंदाजी करेल. अक्षर पटेलला सातव्या क्रमांकावर फलंदाजीची संधी दिली जाईल. अक्षर पटेल फिरकी गोलंदाजीसह फलंदाजीत टीम इंडियाला मजबूत करेल.

फिरकी गोलंदाजीत युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांचा समावेश असेल. लेगस्पिनर युझवेंद्र चहल आणि चायनामन स्पिनर कुलदीप यादव हे तिसर्‍या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजसाठी सर्वात मोठे आव्हान ठरतील. अशा परिस्थितीत कर्णधार हार्दिक पांड्या रवी बिश्नोईला प्लेइंग इलेव्हनमधून वगळेल. दुसऱ्या टी-20 सामन्यात रवी बिश्नोईला एकही विकेट घेता आली नाही.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्या वेगवान गोलंदाजांपैकी अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमारला संधी देईल. उमरान मलिक आणि आवेश खान यांना बाहेर बसावे लागणार आहे.

तिसऱ्या टी-20 सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन -

यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), टिळक वर्मा, ईशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (कर्णधार), अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमार.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : दक्षिण कर्नाटक, आंध्रपर्यंत मजल, मॉन्सूनची वेगवान प्रगती; तमिळनाडूही व्यापला

Lok Sabha Exit Poll 2024 : बहुमतापासून भाजप दूर राहील; एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतरही काँग्रेसला विश्वास

Lok Sabha election 2024 : टपालाद्वारे आलेली मते सर्वप्रथम मोजा; ‘इंडिया’ आघाडी नेत्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Lok Sabha Election 2024 : निकालानंतर भाजपमध्ये फेरबदल; अध्यक्षपद कोणाकडे दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष

चौरीचौरामधील स्मारक दुर्लक्षितच; शतकानंतरही देदीप्यमान इतिहासाच्या उपेक्षेमुळे नागरिकांत नाराजी

SCROLL FOR NEXT