Bajrang Punia Suspended News Marathi sakal
क्रीडा

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Bajrang Punia Suspended News : जुलैमध्ये होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाला मोठा झटका बसला आहे.

Kiran Mahanavar

Bajrang Punia Suspended News : जुलैमध्ये होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाला मोठा झटका बसला आहे. मार्चमध्ये झालेल्या डोपिंग चाचणीत सहभागी न झाल्यामुळे त्याला निलंबित करण्यात आले आहे. बजरंग पुनियाने डोपिंग चाचणीत येण्यास नकार दिल्यानंतर राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने (NADA) हा निर्णय घेतला.

नाडाने 23 एप्रिल रोजी बजरंग पुनियाबाबत निलंबनाचे पत्र लिहिले होते. ज्यामध्ये नाडाने म्हटले आहे की, जोपर्यंत बजरंग पुनियाबाबत अंतरिम निर्णय होत नाही तोपर्यंत तो कोणत्याही कुस्ती स्पर्धेत भाग घेऊ शकत नाही. 65 किलो वजनी गटात पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणे पुनियाचे स्वप्न होते, जे आता भंग पावताना दिसत आहे.

सोनीपत येथे झालेल्या चाचणीदरम्यान बजरंगने यूरीन टेस्टचा नमुना देण्यास नकार दिला होता, त्यानंतर नाडाने त्याला नमुना देण्यास सांगितले होते. नाडाने याबाबत जागतिक उत्तेजक विरोधी संस्थेला (WADA) माहिती दिली, त्यानंतर WADA ने नाडाला बजरंगला नोटीस पाठवून चाचणीला नकार का दिला याचे उत्तर मागितले.

नाडाने 23 एप्रिल रोजी बजरंगला नोटीस बजावली आणि 7 मे पर्यंत उत्तर देण्यास सांगितले. पॅरिस ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी झालेल्या राष्ट्रीय निवड चाचणीत बजरंगला पराभवाचा सामना करावा लागला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: न्यायालयीन कामकाजाचा न्यायमूर्तींच्या आरोग्यावर परिणाम, कामाच्या ताणाबाबत उच्च न्यायालयाची टिप्पणी

मालिकाविश्वात 'या' अभिनेत्याचा दमदार कमबॅक ! आनंदी मालिकेत दिसणार वयाने मोठा नवरा आणि तरुण बायकोची कथा ?

Lord Krishna Descendants : कोण आहेत श्रीकृष्णाचे वंशज? आता कुठे राहतात अन् कशी परिस्थिति आहे..पाहा

Nagpur: धार्मिक प्रतीकांवरून धर्मांतर ठरू शकत नाही; ठोस पुरावे आवश्यक, मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

Eknath Shinde : नाशिकमध्ये योग्य वेळी सगळं योग्य होईल! एकनाथ शिंदेंचे राजकीय संकेत; येवल्यात शिवसेनेची ताकद वाढली

SCROLL FOR NEXT