'आम्ही सुद्धा थोडं क्रिकेट खेळलोय...' भारताच्या सर्वश्रेष्ठ फलंदाजाने विराटवर ओढले ताशेरे, चॅनलला देखील दिला इशारा

Sunil Gavaskar on Virat Kohli : टीम इंडियाचे माजी सलामीवीर सुनील गावसकर यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीवर त्याच्या स्ट्राइक रेटबाबत निशाणा साधला आहे.
Sunil Gavaskar on Virat Kohli News Marathi
Sunil Gavaskar on Virat Kohli News Marathisakal

Sunil Gavaskar on Virat Kohli : टीम इंडियाचे माजी सलामीवीर सुनील गावसकर यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीवर त्याच्या स्ट्राइक रेटबाबत निशाणा साधला आहे.

अलीकडेच विराट कोहलीने असे विधान केले होते की, जे लोक स्ट्राइक रेटवर प्रश्न उपस्थित करत आहेत त्यांची मला पर्वा नाही आणि मी बाहेरच्या गोष्टींकडे लक्ष देत नाही.

विराट कोहलीच्या या वक्तव्यावर सुनील गावसकर नाराज झाले आहेत. त्याने विराटवर जोरदार टीका केली. गावसकर यांच्या म्हणण्यानुसार, विराट कोहलीला बाहेरच्या लोकांच्या वक्तव्याची पर्वा नसेल तर त्यांनी यावर प्रतिक्रिया का दिली.

Sunil Gavaskar on Virat Kohli News Marathi
T20 WC 2024 IND Vs PAK : भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामन्याची जबरदस्त क्रेझ, १ तिकीट इतक्या लाखांना...

खरं तर, टी-20 वर्ल्ड कपपूर्वी विराट कोहलीच्या स्ट्राइक रेटबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याचा स्ट्राइक रेट इतका चांगला नाही. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यानंतर कोहलीने याबाबत वक्तव्य केले होते.

टीकाकारांना उत्तर देताना विराट कोहली म्हणाला की, मी गेली १५ वर्षे सरस खेळत आहे आणि मी माझे काम करत आहे. माझा स्ट्राईक रेट कमी आहे आणि मला फिरकी गोलंदाजी खेळता येत नाही, असेही बोलले जात आहे; पण माझा खेळ कसा आहे हे मला माहित आहे.

Sunil Gavaskar on Virat Kohli News Marathi
RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ जवळपास खल्लास

गुजरात टायटन्स आणि आरसीबी यांच्यातील सामन्यापूर्वी सुनील गावसकर यांनी विराट कोहलीच्या वक्तव्यावर टीका केली होती. ते म्हणाले की, विराट कोहली म्हणतो, त्याला बाहेरच्या लोकांच्या वक्तव्याची पर्वा नाही, मग तो त्यावर प्रतिक्रिया का देतो. आम्ही सुद्धा थोडं क्रिकेट खेळलोय, जास्त नाही आणि आमचा कोणताही अजेंडा नाही.

पुढे ते म्हणाले की, जर त्याचा स्ट्राइक रेट 118 असेल तर समालोचक प्रश्न उपस्थित करतात. आपण जे पाहतो त्याबद्दल बोलतो. आमची स्वतःची कोणतीही आवड किंवा नापसंती नाही. पण विराट असे करून आपल्याच कॉमेंट्री टीमवर टीका करत आहेत. मला आशा आहे की स्टार स्पोर्ट्सला हे समजले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com