Kidney Health
Kidney Health esakal
लाइफस्टाइल

Kidney Health : किडनीचे आरोग्य जपण्यासाठी संतुलित आहार आहे महत्वाचा, ‘या’ खाद्यपदार्थांचा करा समावेश

Monika Lonkar –Kumbhar

Kidney Health : किडनीचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आपण काही छोट्या-मोठ्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी. या गोष्टींची काळजी घेतली, तर किडनीचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होऊ शकते. किडनी हा आपल्या शरीरातील अतिशय महत्वाचा अवयव आहे. जर किडनीचे आरोग्य बिघडले, तर आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे, शरीराच्या इतर भागांवर ही परिणाम होतो.

त्यामुळे, निरोगी राहण्यासाठी तुम्ही संतुलित आहाराची खास काळजी घेणे गरजेचे आहे. निरोगी जीवनशैलीसोबत संतुलित आहार घेणे अतिशय फायद्याचे आणि महत्वाचे आहे. किडनीचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी तुम्ही आहारात काही खाद्यपदार्थांचा समावेश करणे फायद्याचे ठरते. कोणते आहेत हे खाद्यपदार्थ? चला तर मग जाणून घेऊयात.

ऑलिव्ह ऑईल

ऑलिव्ह ऑईलमध्ये ‘व्हिटॅमिन ई’ चे भरपूर प्रमाण आढळून येते. त्यामुळे, ऑलिव्ह ऑईलला व्हिटॅमिन ई चा उत्तम स्त्रोत म्हणून ही ओळखले जाते. हे व्हिटॅमिन ई आणि ऑलिव्ह ऑईलमधील पोषक घटक किडनीचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मदत करतात. जर तुम्ही तुमच्या आहारात ऑलिव्ह ऑईलचा समावेश केला तर, तुम्हाला किडनीशी संबंधित असलेल्या आजारांपासून संरक्षण मिळू शकते.

अंड्याचा पांढरा भाग

अंड्याचे सेवन करणे हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. प्रथिनांचा उत्तम स्त्रोत म्हणून अंड्याला ओळखले जाते. अंड्याचा पांढर भाग हा आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर आहे.

अंड्याच्या पांढऱ्या भागात चांगल्या दर्जाचे प्रोटिन्स आढळून येते. हे प्रोटिन्स आपल्या किडनीचे आरोग्य सुरळीत ठेवण्यासाठी लाभदायी आहे. शिवाय, अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये फॉस्फरसचे प्रमाण कमी आढळून येते. ज्यामुळे, किडनीसाठी ते एक चांगला पर्याय ठरते.

फ्लॉवर

फ्लॉवरमध्ये फायबर्सचे मुबलक प्रमाण आढळून येते. या व्यतिरिक्त फ्लॉवरमध्ये अनेक प्रकारचे पोषकघटक देखील आढळून येतात. हे पोषकघटक आपल्या किडनीचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे, तुमच्या आहारात आठवड्यातून १ किंवा २ वेळा फ्लॉवरचा अवश्य समावेश करा. ज्यामुळे, तुम्हाला निरोगी राहण्यास मदत होईल. या सोबतच फ्लॉवरचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : अमेरिका, कॅनडा अन् अरब देशांकडून 'आप'ला फंडिंग; ED कडून गृहमंत्रालयाला अहवाल

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंबईतील विले पार्ले येथील शाळेत बरोबर ६ वाजता मतदान बंद

Gadchiroli News : कधी वाघ, कधी हत्ती...सोसायचे किती? ग्रामस्थ भयछायेत; जंगलात तेंदूपाने संकलन करताना जीव मुठीत!

Ebrahim Raisi: इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमुळं भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Helmet Man : दागिने, घर, जमीन विकून हा व्यक्ती लोकांना फुकटात वाटतोय हेल्मेट,राघवेंद्रचे होतंय कौतूक

SCROLL FOR NEXT