vatsalya
vatsalya sakal
लाइफस्टाइल

संगोपनासाठी ‘वात्सल्य’

सकाळ वृत्तसेवा

गर्भधारणेपूर्वीपासून महिलांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी विविध योजनांच्या कार्यक्रमांचे एकत्रीकरण करून राज्यात ‘वात्सल्य’ कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. खरंतर यापूर्वी नाशिक जिल्ह्यातील दोन तालुक्यांमध्ये ‘वात्सल्य’ कार्यक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात आला. त्याच्या सकारात्मक परिणामांमुळे आता तो संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत इतर संबंधित विभागांशी समन्वय साधून या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

कार्यक्रम असा राबवला जाणार

या कार्यक्रमात गर्भधारणापूर्व आरोग्य-तपासणी करण्यात येईल. माता व बालकांना आरोग्यासाठी असलेली जोखीम विविध टप्प्यात ओळखणे व आवश्यक सेवेद्वारे जोखीमीचे प्रभावी व्यवस्थापन, बालकांच्या वजनवाढीचे संनियंत्रण करण्यात येईल.

फॉलिक ॲसिड, मल्टिमायक्रोन्यूट्रिएन्ट्स, ‘ड’ जीवनसत्त्व, लसीकरण, अन्य उपचारही देण्यात येतील. प्रसूतिपूर्व, प्रसूतीदरम्यान आणि प्रसूतिपश्चात सेवांमध्येही अतिजोखमीच्या मातांचे मूल्यमापन करून त्यांच्या सर्व संबंधित चाचण्या, उपचार आणि समुपदेशन करण्यात येईल.

बाळाच्या एक हजार दिवसापर्यंतच्या वाढीचे मूल्यमापन करताना वेळोवेळी एएनएम कार्यकर्ते भेटी देतील. त्यांच्यामार्फत बाळाच्या मातेला लोहयुक्त गोळ्या, कॅल्शिअम आणि ‘ड’ जीवनसत्त्व आदी उपचार, तपासणी आणि संदर्भात सेवा देण्यात येणार आहेत.

बालकांचे नियमित लसीकरण, कांगारू मदर केअर, स्तनपानाचे महत्त्व, पूरक आहार, वजन व वाढीचे मूल्यमापन करतानाच आवश्यक जीवनसत्त्व औषधांचे वाटप करणार आहेत. वात्सल्य कार्यक्रमात समुपदेशनाबरोबरच माता आणि बालकांची वाढ व विकास यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

तसेच, माता आणि बालकांच्या आरोग्याच्या सुविधांचे बळकटीकरण करण्यासाठी आरोग्यविषयक विविध कार्यक्रमांचा समन्वय करण्यासोबत विविध शासकीय विभागांचे सहभाग घेण्यात येणार आहे. गृहभेटीद्वारे गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवेवर भर देण्यात येईल.

या कार्यक्रमामुळे राज्यातील सर्व घटकातील महिला आणि बालकांचा योग्य शारीरिक, मानसिक, सामाजिक विकास साध्य होणार आहे. शिवाय सुदृढ बालक जन्माला आल्यामुळे कुपोषणाची समस्या कमी होण्यासह बालकांची बौद्धिक क्षमता वृद्धींगत होण्यास मदत होणार आहे.

लाभार्थी कोण?

प्रसूतिपूर्व कालावधीतील माता आणि गरोदर महिला, दोन वर्षांखालील शिशू.

‘वात्सल्य’ कार्यक्रमाचे उद्दिष्ट

  • कमी दिवसांचे आणि कमी वजनी बालकांच्या जन्माचे प्रमाण कमी करणे

  • जन्मतः बालकांमधील आजारांचे प्रमाण कमी करणे

  • मृत्यूदर प्रमाण कमी करणे

  • निरोगी गर्भधारणा

  • प्रसूतीसाठी माता आरोग्यात सुधारणा करणे

  • बालकांची सुदृढ वाढ होणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accindet: कोणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update: सुनील टिंगरे चौकशीसाठी तयार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Amhi Jarange: 'आम्ही जरांगे -गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका; टीझर रिलीज

Cristiano Ronaldo: शेवटच्या क्षणी पराभव, नेमारनंही डिवचलं अन् रोनाल्डोला अखेर अश्रु अनावर, पाहा Video

Chennai-Mumbai Flight: 172 प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, विमान अज्ञात स्थळी हलवले

SCROLL FOR NEXT