Cleaning Hacks:
Cleaning Hacks: Sakal
लाइफस्टाइल

Cleaning Hacks: प्रिंटेड कपडे धुतांना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

पुजा बोनकिले

avoid these mistakes while washing printed clothes

कपडे धुणे हे खूप अवघड काम आहे. एक छोटीशी चूक ड्रेसचा कापड पूर्णपणे खराब करू शकते. जर महागड्या कपडे असेल तर जास्त काळजी घ्यावी लागते. त्यामुळे अनेक महिला घरी धुण्याऐवजी ड्राय क्लीन करतात. पण ही पद्धत देखील महाग आहे. प्रिटेंड कपडे धुणे मोठे अवघड काम आहे. जर तुम्ही प्रिटेंड कपडे घरी स्वच्छ करण्याचा विचार करत असाल, पण कपडे खराब होण्याची भीती वाटत असेल तर पुढील गोष्टी लक्षात ठेऊ शकता.

  • प्रिंटेड कपडे धुण्यापूर्वी कोणते काम करावे?

कोणतेही प्रिंटेड कपडे धुण्याआधी कपड्याचे फॅब्रिक कोणते आहे तपासावे. कारण त्या कपड्यावर कसे धुवावे याची माहिती असते. याशिवाय, कोणत्या गोष्टींमुळे कपड्यांचा रंग खराब होतो आणि कोणत्या वस्तूंनी कपडे धुवावेत हे देखील तुम्हाला समजते. या सर्व माहितीसाठी तुम्ही प्रिटेंड कापडावरील लेबलची मदत घेऊ शकता.

  • सौम्य वॉशिंग पावडर वापरा

कोणती वॉशिंग पावडर वापरायची हे लेबल तुम्हाला सांगत नसल्यास, नेहमी मऊ वॉशिंग पावडर वापरा . याचे कारण असे की कधीकधी कडक वॉशिंग पावडर कापडाची प्रिंट खराब करू शकते किंवा ते हलके होऊ लागते.

जरी तुम्हाला अनेक प्रकारचे मऊ वॉशिंग पावडर सापडतील, परंतु सॉफ्ट फॅब्रिक क्लिनर वापरणे चांगले. तुम्हाला अनेक प्रकारचे फॅब्रिक क्लीनर सापडतील, परंतु तुम्ही ते फॅब्रिकच्या टेक्सचरनुसार निवडले पाहिजे.

  • कोमट पाणी वापरू नका

प्रिंटेड कपडे कोमट पाण्यात चुकूनही धुऊ नका. कारण गरम पाण्याचा कपड्याच्या प्रिंटवर किंवा त्याच्या रंगावर परिणाम होऊ शकतो. कारण असे अनेक रंग असतात जे गरम पाण्यात टाकल्यावर फिकट होतात आणि त्यामुळे तुमचे संपूर्ण कपडे खराब होऊ लागतात. त्यामुळे जेव्हाही तुम्ही तुमचे कपडे धुता तेव्हा जास्त गरम पाणी वापरू नका.

  • होम ड्राय क्लीनिंग किट

प्रिंटेड कपड्यांवर डाग असतील तर ब्रशने घासू नका. यामुळे प्रिंट खराब होऊ शकते. जर जास्त डाग असतील तर तुम्ही होम ड्राय क्लीनिंग किट वापरू शकता. असे किट बाजारात सहज उपलब्ध आहे.

  • पाण्यात अजिबात भिजवू नका

कापडाची प्रिंट अजिबात खराब होऊ नये असे वाटत असेल तर ते पाण्यात भिजवण्याची चूक करू नका. कारण सतत पाण्यात भिजत राहिल्याने कपड्याचा रंग फिका पडू लागतो आणि प्रिंटही फिकट होते.

  • प्रिंटेड कपडे कसे स्वच्छ करावे

प्रिटेंड कपडे स्वच्छ करण्यासाठी सर्वात आधी पाणी आणि वॉशिंग पावडर एका टबमध्ये घ्यावे. नंतर त्यात बेडशीट 10 मिनिटे भिजत ठेवावे.

नंतर प्रिंटेड कपडे मशीनमध्ये स्वच्छ होण्यासाठी टाकावे. या कपड्यांसोबत इतर कपडे घालू नका.

कपडे स्वच्छ झाल्यावर उन्हात टाकावे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : 'म्हाडा'च्या इमारतीचं छत कोसळलं; विक्रोळीत दोन वृद्धांचा मृत्यू

LinkedIn Jobs Alerts : फ्रेशर आहात आणि चांगली नोकरी हवीय तर हे करायलाच हवं; LinkedIn नेच दिलाय लाखमोलाचा सल्ला

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

Bhagwan Pawar: पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुखांवर निलंबनाची कारवाई! काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

SCROLL FOR NEXT