अर्धे डोके का दुखते? कारण जाणून घेतल्यावर होईल तुमचा गोंधळ दूर esakal
लाइफस्टाइल

अर्धे डोके का दुखते? कारण जाणून घेतल्यावर होईल तुमचा गोंधळ दूर

अर्धे डोके का दुखते? कारण जाणून घेतल्यावर होईल तुमचा गोंधळ दूर

सकाळ वृत्तसेवा

अर्धे डोकेदुखीची अनेक कारणे आहेत आणि बहुतेक अर्धे डोकेदुखी तीन प्रकारची असते. जाणून घ्या सविस्तर

डोकेदुखीची (Headache) अनेक कारणे आहेत. बहुतेक लोकांना कधी ना कधी डोकेदुखी होत असते, पण ती सामान्य असते आणि अनेकदा काही वेळात किंवा काही तासांत बरीही होते. पण, अर्धे डोकेदुखी अत्यंत धोकादायक मानली जाते. या प्रकारच्या डोकेदुखीमध्ये डोळ्यांमध्ये अस्वस्थता आणि वेदना देखील होतात. अर्धे डोकेदुखीची अनेक कारणे आहेत आणि बहुतेक अर्धे डोकेदुखी तीन प्रकारची असते.

अर्धे डोकेदुखीची कारणे...

  • नाकाशी संबंधित संसर्ग

  • नीट झोप न येणे

  • लठ्ठपणा

  • मानेच्या स्नायूंमध्ये ताण किंवा ढेकूळ

  • काळजी / चिंता

  • जास्त डोकेदुखीची औषधे घेणे

  • कॅफिनयुक्त पदार्थांचा अति प्रमाणात सेवन

  • नैराश्‍य

  • एका वेळचे जेवण न घेणे

  • इतर अनेक समस्या ज्या दीर्घकाळ राहिल्यामुळेही डोकेदुखी होऊ शकते

तणावाची डोकेदुखी

ही डोकेदुखी थकवा, भावनिक ताणामुळे आणि मान आणि जबड्याशी संबंधित स्नायू किंवा सांध्यातील कोणत्याही प्रकारच्या समस्यामुळे उद्‌भवते. हे दुखणे डोक्‍याच्या कोणत्याही एका भागात देखील होऊ शकते. एखाद्या समस्येबद्दल विचार केल्याने किंवा वाईट अनुभवांचा वारंवार विचार केल्याने ही वेदना होते.

मायग्रेन

मायग्रेन वेदना तणावग्रस्त वेदनांपेक्षा जास्त धोकादायक आहे. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये मायग्रेनचे प्रमाण दोन ते तीनपट जास्त असते. मायग्रेनचे कारण व्यक्तिपरत्वे बदलू शकते, परंतु वेदनेव्यतिरिक्त काही लक्षणे देखील मायग्रेन पीडितांमध्ये सामान्य असतात. यात थकवा, झोप न लागणे, भावनिक ताण यांसारख्या लक्षणांचा समावेश होतो.

क्‍लस्टर डोकेदुखी

याची प्रकरणे क्वचितच आढळतात, परंतु हे सर्व प्रकारच्या डोकेदुखीपेक्षा अधिक गंभीर आहे. हे स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये पाचपट जास्त वेळा आढळून आले आहे. क्‍लस्टर डोकेदुखी कोणालाही होऊ शकते, परंतु धूम्रपान करणाऱ्या लोकांमध्ये हे अधिक सामान्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET UG Result : अन्सर कीमध्ये ६०९, निकाल लागताच ५४० पण दोन तासांनी १६७ गुण; नीट निकालात गोंधळ, विद्यार्थीनीचे गंभीर आरोप

IND vs ENG: लॉर्ड्सवर रोहित-कोहली रचणार इतिहास! सचिन-द्रविडलाही मागे टाकत करणार '400'चा महाविक्रम

Latest Marathi News Live Update : शिक्षण, आरोग्यसेवा आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याबाबत सरकार अपयशी - AICC सरचिटणीस सचिन पायलट

Beed News: भ्रष्टाचार उघड होताच रातोरात काम सुरू? बीडमध्ये नेमकं काय घडलं?

सोनम वांगचुक यांची प्रकृती कशी आहे? डॉक्टरांनी दिली अधिकृत माहिती, पत्नीचा रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT