सोशल मीडियावर ओळख झालेल्या मुलीला घरी बोलावले! गुंगीचे औषध दिले अन्‌... | Crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime
सोशल मीडियावर ओळख झालेल्या मुलीला घरी बोलावले! गुंगीचे औषध दिले अन्‌...

'सोशल'वर ओळख झालेल्या मुलीला घरी बोलावले, गुंगीचे औषध दिले अन्‌...

मध्य प्रदेश (Madhya Pradesh) येथील ही घटना आहे. सोशल मीडियावर (Social Media) एका तरुणासोबतची मैत्री एका तरुणीला भारी पडलीय. सोशल मीडियावर मैत्री केल्यानंतर तरुणाने लग्नाचे वचन दिले. यानंतर मुलीला घरी बोलावून कोल्ड्रिंक पाजून बेशुद्ध करून तिच्यावर अत्याचार केला. आरोपी तरुण हा मध्य प्रदेशातील मुरैना येथील रहिवासी असून पीडित तरुणी ग्वाल्हेरची असल्याचे सांगण्यात येत आहे. अत्याचाराची घटना घडल्यानंतर तो तरुण आता लग्नाला नकार देत आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: मौलवीशी वाद पडला महागात! पाकिस्तानात चार तरुण ईशनिंदा कायद्याला बळी

चॅटिंगचे रूपांतर प्रेमामध्ये

पीडित तरुणी रतलाम जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर तिची मुरैना जिल्ह्यातील कैलारस येथील निखिल सोनी याच्याशी मैत्री झाली. यानंतर दोघांमध्ये चॅटिंग सुरू झाले आणि ते प्रेमात पडले. निखिलने या तरुणीला त्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी ग्वाल्हेरच्या पडाव पोलिस स्टेशन हद्दीतील न्यू कुशल नगर येथे बोलावले. ही तरुणी त्याच्या घरी पोचली तेव्हा निखिलशिवाय घरी दुसरे कोणी नव्हते. तरुणीने निखिलला त्याच्या घरातील सदस्यांबद्दल विचारले असता, निखिलने सांगितले की, त्याचे कुटुंबीय घरातील कामासाठी बाजारात गेले आहेत आणि थोड्या वेळाने येतील. यानंतर आरोपीने तरुणीला गुंगीचे औषध घातलेले कोल्ड्रिंक दिले. तरुणीने नशेचे कोल्ड्रिंक प्यायला लागताच ती बेशुद्ध झाली. काही वेळाने मुलगी शुद्धीवर आली तेव्हा तरुणाने आपल्यावर अत्याचार केल्याचे तिला समजले.

हेही वाचा: गृहपाठ केला नाही म्हणून निर्दयी पित्याने मुलाला लटकावले पंख्याला!

तरुणीला दिलेले लग्नाचे वचन मोडले

ही बाब लक्षात आल्यानंतर तरुणीने विरोध केला असता तरुणाने लग्नाचे आश्वासन दिले. त्यानंतर तरुणीने त्या तरुणावर लग्नासाठी दबाव टाकला असता तरुणाने दिलेले वचन मोडले. फसवणूक झालेल्या तरुणीने पोलिस ठाणे गाठून या प्रकरणाची तक्रार केली. या तक्रारीवरून पाडव पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

loading image
go to top