Ice cream
Ice cream sakal
लाइफस्टाइल

Ice cream Headache: आईस्क्रीम खाल्ल्यानंतर तुमचंही डोकं दुखतं का? जाणून घ्या त्यामागील कारण

Aishwarya Musale

उन्हाळ्यात आईस्क्रीम खाण्याची एक वेगळीच मजा असते. मन थंड ठेवण्याचा हा उत्तम उपाय आहे. पण काही लोकांसाठी आईस्क्रीम त्रासाचं कारण बनतं, खरं तर आईस्क्रीम खाल्ल्यानंतर काहींना डोकेदुखीचा त्रास जाणवतो. तुमच्यासोबतही असे घडत असेल तर जाणून घ्या यामागचे कारण काय आहे.

आईस्क्रीम खाल्ल्यानंतर डोकेदुखी का होते?

हार्वर्ड मेडिकल न्यूजनुसार, जेव्हा तुम्ही खूप थंड वस्तू सेवन करता तेव्हा अशा वेळी या थंडपणामुळे आपल्या नसांमध्ये एक वेदना निर्माण होते. ज्या कारणामुळे व्यक्तीच्या मेंदूमध्ये झिनझिण्या जाणवतात. याला ब्रेन फ्रीझ असे म्हणतात.

आपल्या मेंदूच्या सेरेब्रल आर्टरी मध्ये अचानकपणे रक्तप्रवाह वाढतो आणि काही वेळेनंतर जश्या जश्या आपल्या नसा पुन्हा पूर्वीच्या स्थितीमध्ये येऊ लागतात, अशा वेळी आपली डोकेदुखी नॉर्मल होऊन जाते.

तज्ञ काय म्हणतात?

संशोधनात असे म्हटले आहे की, ज्या लोकांमध्ये ही समस्या दिसून आली आहे त्यांना गरम पाणी दिले जाते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ब्रेन फ्रीज झाल्यावर कोमट पाण्याने गार्गलिंग करावे. गरम पाणी तोंडाच्या प्रत्येक भागात गेल्यावर शरीरात गरम हवेचा संचार वाढतो.

यामुळे ब्रेन फ्रीझपासून आराम मिळतो.एक्सपोर्टचे असे मत आहे की, ज्या लोकांना आधीच मायग्रेनचा त्रास आहे, त्यांनी जर थंड वस्तूंचे सेवन केले तर ब्रेन फ्रीझचा धोका अधिक असतो. ही समस्या टाळायची असेल तर थंड पदार्थांचे सेवन टाळा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

Nashik Lok Sabha Election 2024: ना पाण्याची सोय, ना उन्हापासून संरक्षण! मतदारांमध्ये तीव्र नाराजी; व्हिलचेअरमुळे दिलासा

SCROLL FOR NEXT