Health Tips esakal
लाइफस्टाइल

Health Tips :  पोटात गॅस झाला की कळायचंच बंद होतं, लगेचच करा हे उपाय,फरक पडेल

या पदार्थांचे सेवन कराल तर पोटदुखीची समस्या होईल छुमंतर

Pooja Karande-Kadam

Health Tips : खाण्याच्या सवयी बरोबर नसतील तर त्याचा थेट परिणाम अन्न पचनावर होतो. खाण्यापिण्याच्या इतक्या वाईट सवयी आहेत की ज्यामुळे दररोज पोट बिघडते. मसालेदार, चटपटीत किंवा तळलेले असो, उकडलेले असे सगळ्याच प्रकारच्या पदार्थांची भेळ आपल्या पोटात रोज साठत असते.

त्यामुळे पोट लगेच खराब होते आणि पोटात गॅस किंवा ऍसिडिटी होऊ लागते. दर दुसर्‍या दिवशी पोटाचा त्रास होणे हे देखील खराब पचनाचे लक्षण असू शकते.

पोट बिघडलं की काहीच करता येत नाही. काही महत्त्वाच्या कामाला जावं म्हटलं तरी पोटात पुन्हा कळ येण्याची शक्यता असते. त्यामुळे या समस्येला कसं नियंत्रणात ठेवायचं याचा भन्नाट घरगुती उपाय आहेत.

पोटदुखीची समस्या घालवण्यासाठी हे करा

बडीशेपचे सेवन

बडीशेप पोट फुगण्याची समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. तसेच तिच्या सेवनाने आम्लपित्त देखील बरे होते. बडीशेप खाल्ल्याने पोटाचे आरोग्य चांगले राहते. ती केवळ पोटाला थंड ठेवत नाही तर पचन सुधारण्यासाठी देखील प्रभावी आहे. लहान मुलांमध्येही गॅसेस झाले तर त्यांना बडीशेपचे पाणी कोमट करून पाजले जाते.

दही

दुधावर प्रक्रिया केल्यानंतर दही तयार होत असले तरी ते पोट दुखीच्या समस्येवर रामबाण उपाय आहे. दह्याचे फायदे पचन सुधारण्यासाठी देखील दिसून येतात. दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात जे पोट निरोगी ठेवतात. दही साधेही खाता येते किंवा रायता बनवूनही खाता येते. (Health Tips)

आले

पोटाच्या समस्यांवर आले रामबाण उपाय आहे. ते सेवन करण्याची पद्धतही खूप सोपी आहे. आल्याचे छोटे तुकडे करून त्यात दीड कप पाणी घालून उकळा. एका कपमध्ये गाळून हा आल्याचा चहा प्या. चवीसाठी हलका मध किंवा लिंबाचा रस देखील घालता येतो.

फ्लेक्स सीड्स

पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी तुम्ही रोज चिया सीड्सचे सेवन करू शकता. या बियांमध्ये भरपूर फायबर असते. पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी फायबरचा खूप चांगला परिणाम होतो. फायबर व्यतिरिक्त, चिया बियांमध्ये आतड्याला अनुकूल बॅक्टेरिया देखील असतात.

सफरचंद

फायबरने समृद्ध सफरचंद आरोग्यासाठी देखील आश्चर्यकारक असल्याचे सिद्ध होते. सफरचंदाचा प्रभाव विशेषतः पचन सुधारण्यात दिसून येतो. सफरचंद खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि अतिसारापासूनही आराम मिळतो. (Stomach Pain)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT